For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Crime : कवठेमहांकाळात माजी उपसभापती अनिल शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला; तालुक्यात खळबळ

02:26 PM Jan 07, 2026 IST | NEETA POTDAR
sangli crime   कवठेमहांकाळात माजी उपसभापती अनिल शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला  तालुक्यात खळबळ
Advertisement

                                  घाटनांद्रे गावात मध्यरात्री धारदार शस्त्राने हल्ला

Advertisement

कवठेमहांकाळ : घाटनांद्रे येथे पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल शहाजी शिंदे यांच्यावर गावातीलच आठ जणांनी ६ जानेवारी रोजी मध्यरात्री धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्याने कवठेमहांकाळ तालुक्यात खळबळ माजली आहे, या घटनेची कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात नोंद झाली असून जखमी अनिल शहाजी शिंदे यांनी उपचार सुरू असताना स्वतः फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेलीअधिक माहिती अशी की, ६ जानेवारी रोजी मध्यरात्री दीड वाजता फिर्यादी अनिल शिंदे हे घरी झोपले असताना आरोपींनी घराची बेल वाजवली. बाहेर कोण आले आहे हे घरातून बघितले त्यावेळी आरोपी शिवम सुनील शिंदे व अक्षय बाळासो डबडे यांनी फिर्यादीस घरातून बाहेर बोलवून फिर्यादी यांनी काल सोडविलेल्या भांडणाचा राग मनात धरुन शिवम सुनील शिंदेने कोयत्याने फिर्यादींच्या हातावर मारुन जखमी करुन आरोपी अमोल बबन खाडे, अविनाश बबन खाडे, अक्षय बाळासो

Advertisement

दबडे, अविनाश बाळासा दबडे, अक्षय दादासो जाधव, निलेश अनिल जाधव, नासिर जावेद मणेर सर्व राहणार घाटनांद्रे यांनी फिर्यादीस बेकायदेशीर जमाव जमवुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन 1 शिवीगाळी करून फिर्यादी यांची दुचाकी गाडी व घराचा दरवाजा मोडुन नुकसान केले आहे.

फिर्यादी यांनी कोयत्याचे वार चुकविण्याचा प्रयत्न केला, यावेळी फिर्यादीचा भाचा आल्याने प्रसनावधन ळले, फिर्यादीच्या दोन्ही हातावरकोयत्याने गंभीर वार झाले आहेत.जखमी अवस्थेत फिर्यादी यांनारुग्णालयात दाखल केले आहे. जखमीअवस्थेत फिर्यादी यांनी आठ आरोपीविरुद्ध फिर्याद दिली असून पुढीलतपास पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार बळे यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षकशिवशरण हे करीत आहेत.

Advertisement
Tags :

.