For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pandharpur Crime | डोक्यात कोयता घातला, जिवे मारण्याची धमकी दिली...; पंढरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल होताच आरोपी फरार?

03:11 PM Jun 07, 2026 IST | NEETA POTDAR
pandharpur crime   डोक्यात कोयता घातला  जिवे मारण्याची धमकी दिली     पंढरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल होताच आरोपी फरार
Advertisement

Advertisement

पंढरपूर -जुन्या भांडणाचा राग मनात धरून पंढरपूर बस स्टैंड परिसरात एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शामराव रामा पवार (बय ३६, रा. शेवते, ता. पंढरपूर) हे बस स्टँड परिसरात असताना आरोपींनी त्यांना गाठले. आरोपींनी जुन्या वादाचा राग मनात धरून फिर्यादीला शिवीगाळ केली आणि त्यानंतर त्यांच्यावर हल्ला केला.

Advertisement

हल्ल्यात आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात कोयता आणि सळईने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. आरोपींमध्ये अजय नवगिरे, सोमा देवकर, अमोल बंदपट्टे, अनिल कांबळे, लखन बंदपट्टे आणि इतर दोन अज्ञात इसमांचा समावेश आहे. मारहाण केल्यानंतर आरोपींनी फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास पोहेकॉ बाघमारे करत आहेत.

Advertisement
Tags :

.