अभियांत्रिकी प्रवेश अर्ज भरण्यासाठी 24 जुलैपर्यंत मुदत! 2 ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द होणार
कोल्हापूर प्रतिनिधी
अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. प्रवेश अर्ज (नावनोंदणी) करण्यासाठी 24 जुलैपर्यंत मुदत आहे. अंतिम गुणवत्ता यादी 2 ऑगस्ट रोजी प्रसिध्द होणार आहे. प्रवेशाचे वेळापत्रक राज्य सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द झाले आहे.
राज्य सीईटी सेलने अर्ज करण्यासाठी 24 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. सध्या गुणवत्ता यादी जाहीर होईपर्यंतचे वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यामध्ये 14 ते 24 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. कागदपत्र तपासणी व अर्ज निश्चिती 15 ते 25 जुलैपर्यंत मुदत आहे.
प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी 27 जुलैला प्रसिध्द होणार आहे. या यादीमध्ये काही आक्षेप किंवा तृटी असल्यास 28 ते 30 जुलैपर्यंत तक्रार नोंदवायची आहे. प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी 2 ऑगस्टला प्रसिध्द होणार आहे. शहरातील शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभाग, केआयटी, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज या महाविद्यालयात फॅसिलेटीज सेंटरची सुविधा उपलब्ध आहे, तरी विद्यार्थ्यांनी या फॅसिलेटीज सेंटरवर जावून अर्ज भरून, कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. अनेक दिवसापासून प्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली असून, पहिल्या दिवसापासून नावनोंदणी अर्ज भरण्यासाठी चांगला प्रतिसात मिळत आहे.