For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुलांचे आधार क्रमांक बायोमेट्रिक अपडेटसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत

11:14 AM Apr 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुलांचे आधार क्रमांक बायोमेट्रिक अपडेटसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत
Advertisement

बेंगळूर : राज्यातील 5 ते 17 वयोगटातील मुलांचे आधार क्रमांक  बायोमेट्रिक पद्धतीने अपडेट करण्यासंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. या वयोगटातील सर्व मुलांच्या आधार क्रमांकांचे बायोमेट्रिक अपडेटसाठी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ही सुविधा राज्यातील सर्व आधार सेवा केंद्रांवर पूर्णपणे मोफत दिली जात आहे. बायोमेट्रिक अपडेट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांचे आधार कार्ड आणि संबंधित आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या आधार केंद्राला भेट द्यावी, असे आवाहन सरकारने केले आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व पालकांना ही प्रक्रिया नियोजित वेळेत जबाबदारीने पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

अपडेटची आवश्यकता कशाला?

मुलांचे आधारकार्ड बायोमेट्रिक पद्धतीने अपडेट केल्यामुळे विविध सरकारी आणि शैक्षणिक सुविधा मिळविणे सुलभ होईल. शाळेत प्रवेश घेणे, विविध स्पर्धा परीक्षांना बसणे, सरकारी योजनांचा लाभ घेणे तसेच शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षण सुविधांसाठी बायोमेट्रिक पद्धतीने आधार क्रमांक  अपडेट असणे गरजेचे आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.