For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रासायनिक पाण्यामुळे वारणा नदीपात्रात मृत माशांचा खच : नागरिकांतून हळहळ, जिवितास धोका, नदीपात्राच्या परिसरात दुर्गंधी

05:00 PM Dec 25, 2023 IST | Kalyani Amanagi
रासायनिक पाण्यामुळे वारणा नदीपात्रात मृत माशांचा खच   नागरिकांतून हळहळ  जिवितास धोका  नदीपात्राच्या परिसरात दुर्गंधी
Advertisement

Advertisement

वारणानगर प्रतिनिधी

वारणा नदीत रासायनिक मिश्रीत पाणी मिसळल्याने नदीतील लाखो मासे मृत पावले असून कोडोली - चिकुर्डे (ता. पन्हाळा) धरणाजवळ व काठावर या मृत माशाचा खच पाहून नागरिक हळहळत व्यक्त करत असून नदीतील दूषीत पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या जिवीतास धोकाही निर्माण झाला आहे.

Advertisement

वारणा नदीत पाण्याची पातळी कमी अधिक होत आहे याचा फायदा उठवत या नदीपात्रात उद्योगातील कारखान्यातून रासायनिक पाणी सोडल्याने या पात्रातील पाणी दूषीत होऊन लाखो मासे मृत झाले आहेत आज सोमवार दि. २५ रोजी सकाळी ११ वा. च्या सुमारास कोडोली धरण व नदीपत्राच्या बाजूला सर्वत्र पाच हजारापेक्षा अधिक मोठ्या माशाचा तर लहान मृत माशाचा हजारोच्या संखेने खच पडलेला आहे याशिवाय नदीकाठच्या दोन्ही तिरावरील शेकडो गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते प्रत्येक वर्षीच असे घडते प्राथमिक स्वरूपात प्रदूषन महामंडळ दखल घेते यानतंर मात्र दूषीत पाणी कोणी सोडले याचा शोध घेवून त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही किंवा कारवाई देखील होत नाही असे अनभुव येत असल्याने नागरिकांत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभाराबाबत असंतोष पसरला आहे.

वारणा नदी पात्रातील दूषीत पाण्यासंदर्भात जय शिवराय किसान संघटनेचे संस्थापक शिवाजी माने यानी गतवर्षी दि.३ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदूषन महामंडळाकडे निवेदन देवून तक्रार दाखल केल्यावर प्रदूषन मंडळाच्या क्षेत्र अधिकारी वर्षा कदम, अर्जुन जाधव यानी वारणा काठावर तसेच चिकुर्डे - कोडोली ता. पन्हाळा येथील धरणावर भेट देऊन पंचनामा केला परंतु यासंदर्भात कोणावर कारवाई केली किंवा नाही हे आजअखेर महामंडळाने जाहिर केलेले नाही.
बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, घसा खवखवने,ताप थंडी व चिकनगुनिया अशा अजाराने डोके वर काढले आहे, कोरोना सह नव्या प्रकारचे रोग डोके वर काढत आहेत या दूषीत पाण्यामुळे रोगराई वाढणार आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यांस . धोका वाढला आहे. नदी काठचे लाखो संखेने मृत माशाचा पडलेला खच पहाण्यास नागरिक गर्दी करत हे चित्र पहाताना हळहळत व्यक्त करत आहेत.मृतमाशामुळे किती नुकसान झाले, पाणी प्रदूषणाने किती नुकसान झाले याचा प्रदूषण महामंडळाने आजवर कधीही विचार केलेला नाही किंवा कडक कारवाई केलेली नाही त्यामुळे असे प्रकार वारणा काठच्या गावांना कायम सोसावे लागत आहेत.

पाणी उकळून प्यावे

वारणा नदीत रासायनिक मिश्रीत दूषीत पाणी मिसळल्याने ज्या गावांना पिण्याच्या पाण्याचा वारणा नदीवरून पाणी पुरवठा होतो या गावातील नागरिकांनी पाणी उकळून थंड झाल्यावर पिण्यासाठी वापरावे असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून केले आहे.

मृत माशे बाजारात विक्रीला

कोडोली येथे वारणा नदीपात्रात मृत मासे आढळून आले आहेत. हे मृतमासे गोळा करून काही मच्छीमार बाजारामध्ये नेऊन विक्री करण्याचा प्रयत्न करू शकतात त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. या मृत माशांना संकलित करण्यासाठी लोकांनीं चिकुर्डे पुलाजवळ गर्दी केली आहे तथापी विषारी पाण्यामुळे मृत झालेले मासे खाल्यांने आरोग्यासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.