For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डी क्लर्कच्या अष्टपैलू कामगिरीने मुंबई पराभूत

06:58 AM Jan 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
डी क्लर्कच्या अष्टपैलू कामगिरीने मुंबई पराभूत
Advertisement

  शेवटच्या चेंडूवर आरसीबीचा रोमांचक विजय : क्लर्कची 4 बळी व नाबाद 63 धावांची खेळ

Advertisement

द.आफ्रिकेची नदिन डी क्लर्कच्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर येथील डी.वाय. पाटील स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या महिलांच्या प्रीमियर लीग टी-20 स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने (आरसीबी) विद्यमान विजेत्या मुंबई इंडियन्सवर शेवटच्या चेंडूवर रोमांचक विजय मिळविला. नदिन डी क्लर्क सामनावीरची मानकरी ठरली.

या सामन्यात 25 वर्षीय डी क्लर्कने भेदक गोलंदाजी करताना 26 धावांत 4 गडी बाद केले तर फलंदाजीत तिने 44 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 63 धावा झळकवत आपल्या संघाला एकहाती विजय मिळवून दिला. या सामन्यात आरसीबीला शेवटच्या षटकात विजयासाठी 18 धावांची जरुरी होती. मुंबई इंडियन्सच्या नॅट सिव्हेर ब्रंटने हे शेवटचे षटक टाकले. पहिले दोन चेंडू निर्धाव गेल्यानंतर डी क्लर्कने तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि चौथ्या चेंडूवर चौकार ठोकला. त्यामुळे आरसीबीला शेवटच्या 2 चेंडूत विजयासाठी 8 धावांची जरुरी होती. पाचव्या चेंडूवर डी क्लर्कने अप्रतिम षटकार खेचला त्यामुळे त्यांना शेवटच्या चेंडूवर केवळ 2 धावांची जरुरी होती आणि डी क्लर्कने ब्रंटच्या शेवटच्या चेंडूवर विजयी चौकार ठोकून मुंबई इंडियन्सचा विजयाचा घास खेचून घेतला.  आरसीबीच्या विजयाची तीच शिल्पकार ठरली.

Advertisement

आरसीबीने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी दिली. मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 6 बाद 154 धावा जमविल्या. मुंबई इंडियन्सच्या डावामध्ये सलामीच्या कमलिनीने 28 चेंडूत 5 चौकारांसह 32, कर्णधार हरमनप्रित कौरने 17 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 20, निकोला कॅरीने 29 चेंडूत 4 चौकारांसह 40 तर सजीवन सजनाने 25 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 45 धावा जमविल्या. कॅरी आणि सजना यांनी पाचव्या गड्यासाठी 82 धावांची भागिदारी केल्याने मुंबई इंडियन्सला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. मुंबई इंडियन्सच्या डावामध्ये 2 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. मुंबई इंडियन्सने पावरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 34 धावा जमविताना 1 गडी गमविला. त्यांचे अर्धशतक 52 चेंडूत तर शतक 90 चेंडूत आणि दीड शतक 117 चेंडूत नोंदविले गेले. आरसीबीतर्फे डिक्लर्कने 26 धावांत 4 तर बेल आणि श्रेयांका पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना आरसीबीच्या डावाला कर्णधार मानधना आणि हॅरिस यांनी चांगली सुरूवात करुन दिली. या जोडीने 23 चेंडूत 40 धावांची भागिदारी केली. इस्माईलने मानधनाला झेलबाद केले. तिने 4 चौकारांसह 13 चेंडूत 18 धावा जमविल्या. ग्रेस हॅरिसने 12 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 25 धावा केल्या. हेमलता 1 चौकारांसह 7, रिचा घोष 1 चौकारांसह 6, राधा यादव एका धावेवर बाद झाली. त्यामुळे आरसीबीची स्थिती यावेळी 5 बाद 65 अशी होती. त्यानंतर डी क्लर्क आणि अरुंधती रे•ाr यांनी सहाव्या गड्यासाठी 52 धावांची भागिदारी केली. रे•ाrने 25 चेंडूत 2 चौकारांसह 20 धावा जमविल्या. कॅरीने श्रेयांका पाटीलला त्रिफळाचीत केले. 17 षटकाअखेर आरसीबीने 7 बाद 121 धावा जमविल्या होत्या. डी क्लर्क आणि प्रेमा रावत यांनी आपल्या संघाला शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून दिला. रावतने 4 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 8 धावा केल्या. डी क्लर्कने 44 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 63 धावा झळकविल्या. आरसीबीच्या डावात 3 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. आरसीबीने पावरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 57 धावा जमविताना 2 गडी गमविले. आरसीबीचे अर्धशतक 31 चेंडूत, शतक 83 चेंडूत तर दीड शतक 119 चेंडूत नोंदविले गेले. डिक्लर्कने 42 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह र्आशतक झळकविले. मुंबई संघातर्फे कॅरीने आणि अॅमेलिया केर यांनी प्रत्येकी 2 तर नॅट सिव्हेर ब्रंट, शबनीम इस्माईल, अमनजोत कौर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. गेल्या पाच सामन्यात आरसीबीने मुंबई इंडियन्सवर मिळविलेला हा चौथा विजय आहे.

संक्षिप्त धावफलक : मुंबई इंडियन्स 20 षटकांत 6 बाद 154 (सजीवन सजना 45, कॅरी 40, कमलिनी 32, हरमनप्रित कौर 20, अवांतर 9, डी क्लर्क 4-26, बेल, श्रेयांका पाटील प्रत्येकी 1 बळी), आरसीबी 20 षटकांत 7 बाद 157 (डी क्लर्क नाबाद 63, अरुंधती रे•ाr 20, हॅरिस 25, मानधना 18, रावत नाबाद 8, अवांतर 8, कॅरी व अॅमेलिया केर प्रत्येकी 2 बळी, नॅट सिव्हर ब्रंट, इस्माईल, अमनजोत कौर प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.