For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Wari Pandharchi 2025: तुकाराम महाराज संस्थान मंदिरात DCM Ajit Pawar यांनी घेतले दर्शन

01:57 PM Jun 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
wari pandharchi 2025  तुकाराम महाराज संस्थान मंदिरात dcm ajit pawar यांनी घेतले दर्शन
Advertisement

दर्शनानंतर संस्थानच्यावतीने अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला

Advertisement

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले.

यावेळी आमदार सुनील शेळके, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे आदी उपस्थित होते.

Advertisement

दर्शनानंतर संस्थानच्यावतीने अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला. टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात चिंब झालेले वारकरी, 'ज्ञानोबा माऊली', 'माऊली, माऊली' चा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी अशा भक्तिमय वातावरणात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

Advertisement
Tags :

.