For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येतील प्रभू रामलल्ला यांचे डोळ्यांचे पारणे फेडणारे रूप

05:23 PM Jan 22, 2024 IST | Abhijeet Khandekar
प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येतील प्रभू रामलल्ला यांचे डोळ्यांचे पारणे फेडणारे रूप
Ramlalla in Ayodhya Pranapratistha
Advertisement

पीएम मोदींनी सोमवारी अयोध्या राम मंदिराच्या गर्भगृहात प्रभू राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा केली. 51 इंची मूर्तीची पहिली झलक आज जगासमोर आली आहे. कर्नाटकातील अरुण योगीराज यांनी साकरलेल्या रामलल्लाच्या मुर्तीमध्ये निर्दोषपणा, जिवंतपणा आणि या सर्वोत्कृष्टता या तीन गोष्टींमुळे निवडण्यात आल्याचे ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Advertisement

रामलल्लाच्या मुर्तीची पहिली झलक आज जगासमोर आली. आयोध्येत अभुतपुर्व उत्साहात पार पडलेल्या या उत्सवामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज त्याची प्राण प्रतिष्ठापणा करण्यात आली. प्रभुरामांच्या आरस्पानी रुप पाहून जगभरातील रामभक्त प्रभुरामाच्या मुर्तीसमोर नतमस्तक झाले.

डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या मुर्तीची काही वैशिष्ट्ये आपण पाहूयात.
संपुर्ण दागिन्यांनी मढवलेली मूर्ती दागिन्यांनी सजलेली आहे. डोक्यापासून पायापर्यंत अनेक दागिन्यांनी सजलेल्या मुर्ती भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रभु रामाच्या हातामध्ये सोन्याचे धनुष्य आणि बाण असून कपाळाला चांदीचा आणि लाल रंगाचा तिलक लावलेला आहे.
राम लल्लाला पिवळ्या रंगाचे धोतर परिधान केलं असून त्यावरही दागिने सजवलेली आहेत.

Advertisement

मूर्ती काळ्या शाळीग्राम दगडात कोरलेली असल्याने तीचा रंग काळा आहे. धर्मग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे भगवान रामाचे रूप यामुर्तीमध्ये साकारलेले आहे. प्रभू रामाचे राजेशाही वैशिष्ट्ये प्रतिबिंबित होणारे दागिने मूर्तीवर जडवलेले आहेत. मूर्ती भगवान रामाची पाच वर्षांची आहे, कारण हिंदू धर्मग्रंथानुसार हे वय निर्दोषतेचे मानले जाते. म्हणजे या वयात केलेल्या चुका माफ केल्या जातात.

रामलल्लाच्या मूर्तीचे हात दुमडलेले असले तरी प्रभू राम ‘अजानुबाहू’ असल्याने त्या मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत पोहोचतील अशी रचना केली आहे. शास्त्रात भगवान रामाच्या डोळ्यांचे वर्णन कमळासारखे असल्याचे वर्णन केले आहे. मूर्तिकार आयुन योगीराज यांनी प्रभू राम लल्लाच्या मूर्तीच्या डोळ्यांची रचना करताना त्या वर्णनाचे पालन करून हुबेहुब त्यापद्धतीने साकार केले आहे.

Advertisement
Tags :

.