Ichalkaranji News | इचलकरंजीत सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी काढली 'धिंड'; घटनास्थळी नेऊन फिरवल्याने नागरिकांची मोठी गर्दी!
इचलकरंजी : दहशत माजवततरुणाकडून रोख रक्कम, मोबाईल आणि मोपेड असा सुमारे १ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना शिवाजीनगर पोलिसांनी सोमवारी घटनास्थळी नेऊन फिरवले. या कारवाईमुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
या प्रकरणातील संशयित आरोपी रुपेश पंडित नरवाडे (रा. शास्त्री सोसायटी, भोनेमाळ) व सुमित प्रदीप परीट (रा. साई मंदिरजवळ, कबनूर) यांना पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात घटनास्थळीइचलकरंजी संशयित रुपेश नरवाडे आणि सुमित परिट यांना घटनास्थळी तपासासाठी फिरवताना शिवाजीनगर पोलीस.फिरविले. चार दिवसांपूर्वी रुतिक जिव्हाजी कौले (वय २५, रा.लांडे हॉस्पिटलजवळ) हे भोनेमाळ येथील आसिफ पठाण यांच्या कार्यालयासमोर थांबले असतानासंशयित आरोपींनी त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली होती. त्यानंतर जबरदस्तीने त्यांच्या खिशातील मोबाईल, मोपेडच्या डिकीत ठेवलेली रोख रक्कम तसेच मोपेड घेऊन पोबारा केला होता.
गुन्ह्याचा तपास अधिक प्रभावीपणे करण्यासाठी पोलिसांनी संशयित आरोपींना एएससी कॉ लेज, राजर्षी छत्रपती शाहू पुतळा, जुने एस.टी. स्टैंड परिसर तसेच गुन्ह्याशी संबंधित विविध ठिकाणी नेऊन घटनाक्रमाची माहिती घेतली. यादरम्यान गुन्ह्याच्या हालचालींची पडताळणी करण्यात आली. शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.