दिवसा घरफोड्या करणाऱ्यास अटक
कोल्हापूर :
दिवसा घरफोड्या करणारा पोलीस रेकॉर्डवरील अट्टल घरफोड्याला अटक केली. मयुर उर्फ अमित सोपान भुंडे (रा. आई एकवीरा अपार्टमेंट, गुरवली पार्क, टिटवाळा, कल्याण, जि. ठाणे) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 4 लाख ऊपये किंमतीचे सोन्याचे दागिणे आणि गुह्यात वापरलेली मोपेड असा 4 लाख 20 हजार ऊपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई करवीर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने केली आहे, अशी माहिती करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यानी दिली.
पोलीस निरीक्षक शिंदे म्हणाले, शहरातील फुलेवाडी येथील अमेय अपार्टमेंट मधील पाचव्या मजल्यावरील संपदा विलास झलगे या शिक्षीका राहत आहे. त्या 1 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी नोकरी करीत असलेल्या शाळेत गेल्या होत्या. त्यामुळे त्याच्या प्लॅटमध्ये कोणीही नव्हते. याची संधी साधून रेकॉर्डवरील घरफोड्या मयुर उर्फ अमित भुंडे याने त्याच्या प्लॅटच्या दरवाज्याचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. प्लॅटमधील बेडऊममध्ये असलेले कपाट फोडून त्यामधील, 1 लाख 50 हजार ऊपये किंमतीच्या 27.84 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या चार बागड्या, 50 हजार ऊपयाचे 10. 120 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र, 1 लाख 50 हजार ऊपयांचे 30.320 ग्रॅम वजनाचे गंठण, 50 हजार ऊपयाचे 9.630 ग्रॅम वजनाची चेन असा चार लाख ऊपये किंमतीचे सोन्याच्या दागिण्याची चोरी कऊन पोबारा केला होता.
पण तो अपार्टमेंटमध्ये येताना आणि चोरी कऊन जाता अपार्टमेंटच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या कैद झाला होता. त्याचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध सुऊ घेत, तो राहत असलेल्या टिटवाळा (जि. ठाणे) येथील घरावर छापा टाकला. यावेळी त्याला घरफोडीच्या गुह्यात गंगापूर (जि. नाशिक) पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक कऊन नेल्याची माहिती मिळाली. त्यावऊन त्याला न्यायालयाच्या आदेशाने अटक केली. त्याच्याकडून संपदा झलगे याच्या प्लॅटमधून चोरी केलेल्या 4 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे आणि गुह्यात वापरलेली 20 हजार ऊपयो किंमतीची मोपेड असा 4 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिवसा घरफोड्या करणारा अट्टल घरफोड्या
करवीर पोलिसांनी मयुर उर्फ अमित भुंडे या अट्टल घरफोड्याला अटक केली आहे. तो पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याने आतापर्यंत 40 घरफोड्या केल्या आहेत. त्यासर्व घरफोड्या त्याने दिवसाच केल्या आहेत. त्यामुळे दिवसा घरफोड्या करणारा अट्याल घरफोड्या म्हणून पोलिसांच्या दप्तरी नोंद झाली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.