38 वर्षांनी येणार ‘डेज ऑफ थंडर’चा सीक्वेल
टॉम क्रूजची ऐनी हॅथवेसोबत जमणार जोडी
टॉप गन आणि मिशन इम्पॉसिबल यासारख्या यशस्वी चित्रपट फ्रँचाइजीद्वारे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूज सध्या स्वत: स्वत:च्या एका चित्रपटाच्या सीक्वेलवरून चर्चेत आहे. त्याचा लोकप्रिय चित्रपट डेज
ऑफ थंडरचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
38 वर्षांपूर्वी प्रदर्शित डेज ऑफ थंडरच्या अधिकृत सीक्वेलची घोषणा टॉमनेच केली आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत
हॉलिवूडची लेडी सुपरस्टार ऐनी
हॅथवे दिसून येणार आहे. ऐनी आणि त्याची जोडी मोठ्या पडद्यावर पाहणे चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच असणार आहे.
1990 च्या रेसिंग ड्रामा चित्रपटाच्या या बहुप्रतीक्षित चित्रपटात ऐनी त्याच्यासोबत दिसणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. हा सीक्वेल 2028 साली प्रदर्शित होणार आहे. चाहते आता
टॉम क्रूजला कार रेसल ‘कोल ट्रिकल’च्या भूमिकेत पुन्हा पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.
टॉम क्रूज याचबरोबर आगामी काळात टॉप गन 3 या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरणही सुरू झाले आहे. टॉप गन ही
टॉमची सर्वात यशस्वी फिल्म फ्रेंचाइजी असून त्याचा जगभरात एक मोठा चाहतावर्ग आहे.