राज्यस्तरीय खासगी वसतिगृह संघटनेच्या कार्याध्यक्षपदी दयानंद कुबल
ओटवणे प्रतिनिधी
राज्यस्तरीय 'खाजगी वसतिगृह संघटनेच्या कार्याध्यक्षपदी सिंधुदुर्गातील कोकण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील शेकडो खाजगी वसतिगृहे चालवणाऱ्या संस्थांच्या सामूहिक प्रयत्नातून या संघटनेची निर्मिती झाली असून पुणे येथे झालेल्या बैठकीत कार्यकारणीची निवड करण्यात आली. राज्यात खाजगी वसतिगृहे चालवणाऱ्या संस्थांसमोर सध्या अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राज्यातील सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन या खाजगी वसतिगृह संघटनेची स्थापना केली आहे. खाजगी वसतिगृह संघटनेची निवडण्यात आलेली कार्यकारणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष महेश निंबाळकर (पुणे), उपाध्यक्ष सुजाता अंगडी, जीवन संवर्धन फाउंडेशन (ठाणे), सचिव महेश यादव, स्पर्श शेल्टर होम (पुणे), सहसचिव अक्षदा भोसले, अंकुर सामाजिक संस्था (डोंबिवली), कोषाध्यक्ष विश्वास लोंढे, शाश्वत उत्क्रांती प्रतिष्ठान (ठाणे), सदस्य : तेजस कोठावळे (आनंदग्राम गुरुकुल पुणे), राजीव करडे (श्रावण बाळ आश्रम पुणे), प्रसाद मोहिते (प्रार्थना फाऊंडेशन सोलापूर), दत्ता इंगळे (जीवनविद्या परिवर्तन ट्रस्ट पुणे), शरद आढाव (जनजागृती प्रतिष्ठान, अहिल्यानगर), मधुकर सोनवणे (खुशीग्राम फाऊंडेशन लातूर), सुधीर भोसले (पारधी समाज जनजागृती सेवाभावी संस्था बीड).बालकांच्या संरक्षणासाठी आणि प्रामाणिक संस्थांच्या हक्कांसाठी संघटना लढा देणार असुन वसतिगृह क्षेत्रात विश्वास निर्माण करण्यासाठी ही संघटना महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे या संघटनेचे कार्याध्यक्ष दयानंद कुबल यांनी सांगितले तर खाजगी वसतिगृह संस्थांच्या पाठीमागे ही संघटना सरकार दरबारी एक संयुक्त, जबाबदार आणि कायदेशीर आवाज बनून उभी राहणार असल्याचे खाजगी संस्था वसतिगृह संघटननेचे अध्यक्ष महेश निंबाळकर यांनी सांगितले.