कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कराडच्या स्टेडियमवर डे-नाईट क्रिकेट

05:57 PM Jun 11, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कराड / देवदास मुळे :

Advertisement

पश्चिम महाराष्ट्रात पुण्यानंतर कराडला आंतरराष्ट्रीय सुविधा असणारे स्टेडियम उभारण्यात येणार असून विशेष म्हणजे दिवस-रात्र क्रिकेट सामने होण्यासाठी आवश्यक विद्युत व्यवस्थाही करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पात सोलरवर विद्युत व्यवस्था केली जाणार आहे. सुमारे ९६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असलेला स्टेडियम नूतनीकरणाचा प्रकल्प दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या कारकिर्दीतील लक्षवेधी ठरणार आहे.

Advertisement

कराडमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या उभारणीला गेल्यावर्षी ५० वर्षे पूर्ण झाली. कराडकरांनी स्टेडियमचा सुवर्ण महोत्सवही थाटात साजरा केला. त्यानंतर स्टेडियमवर कृष्णा परिवारातर्फे आयोजित केलेले आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन स्टेडियमच्या मेकओव्हरची मुहूर्तमेढ ठरले. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी स्टेडियमवरील सभेत तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्टेडियमसाठी निधीची मागणी केली. फडणवीस यांनी ती तत्काळ मान्य केली. त्यानंतर स्टेडियमसाठी ९६ कोटी रुपयांवा निधी मंजूर झाला युनिक आराखडा बनवण्याची सूचना स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना व्हावा, अशा दृष्टिने पुनर्विकासाचा आराखडा बनवा. जगातील चांगल्या स्टेडियमचा अभ्यास करून युनिक आराखडा बनवा, अशी सूचना आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केली होती. त्यानुसार डिझाईन बनवले आहे.

स्टेडियमच्या पुनर्विकासात आयुष्यमान संपलेल्या व जीर्ण इमारती नव्याने बांधण्यात येतील. पॅव्हेलियन इमारत पाहून नव्याने स्पोर्टस् कॉम्प्लेक्स बांधण्यात येणार आहे. यात तळमजल्यावर २३०० चौरस मीटर, पहिल्या मजल्यावर ३२०० चौरस मीटर व दुसऱ्या मजल्यावर २००० चौरस मीटर असे एकूण ७५०० चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम करण्यात येणार आहे. यात तळमजल्यामध्ये ४ अद्ययावत बॅडमिंटन कोर्ट हॉल, ३ टेबल टेनिस कोर्ट हॉल, मल्टिपर्पज हॉल, तिकीट काऊंटर, क्रीडा संचालक कार्यालय, एन्ट्री लॉबी, चेजिंग रुम, कॉन्फरन्स हॉल, लिप्ट, खेळाडूंसाठी एन्टरन्स लॉबी, पॅव्हेलियनची तरतूद केलेली आहे. स्वच्छतागृहे असणार आहेत.

स्पोर्टस् कॉम्प्लेक्सच्या मजल्यावर व्हॉलीबॉल पहिल्या कोर्ट, कैफेटेरिया, किचन, पेन्ट्री, ओपन गॅलरीज, बैटमिंटन कोर्टसाठी खुली जागा, स्वच्छतागृहे असणार आहेत.

दुसऱ्या मजल्यावर व्ही. आय. पी. लाऊंज, किचन व पेन्ट्री, कॅफेटेरिया, खेळाडूंसाठी निवास व्यवस्था, चेजिंग रुम, कॉमन लॉबी, स्टोअर रुम, कॉमन टॉयलेट रुम असणार आहे. गरजेनुसार फर्निचरनी तरतूद करण्यात आली आहे.

क्रीडा संकुलातील संपूर्ण मलनि:स्सारण प्रक्रिया करण्यात येणार आहे. संकुलाच्या इमारतीथे आतून व बाहेरुन विद्युतीकरण करण्यात येणार आहे. बैठक व्यवस्थेचे विद्युत्तीकरण करण्यात येणार आहे. व्हीआयपी लॉन्जमध्ये वातानुकुलित यंत्रणा बसविण्यात येणार आहे. छतावरती सोलरची व्यवस्था व अग्निशमन यंत्रणा बसवण्यात येणार आहे. कामाची मुदत २ वर्षे असून आवश्यकतेनुसार या आराखड्यात बदल होऊ शकतात

स्टेडियमच्या पायऱ्या उयच्या असल्याने त्याची झीज झाली होती. काही ठिकाणी पायऱ्या कमकुवत होत्या. आता या पायऱ्या नव्याने बांधण्यात येणार आहेत. स्टेडियममध्ये प्रेक्षकांसाठी ८ ब्लॉक असून त्यापैकी ४ ब्लॉकवर छत असणार आहे. त्यासाठी टेन्साईल सफरची तरतूद करण्यात आली असून ४ ब्लॉक खुले आहेत. ४ ब्लॉकमध्ये बकेट सिटची व उर्वरित ४ ब्लॉकमध्ये बांधकाम व फरशी कामात बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

क्रिकेट मैदानासाठी अद्ययावत फ्लड लाईटस् स्टेडियमवर लावण्यात येणार आहेत. त्यामुळे दिवस-रात्र विक्रेट सामना स्टेडियमवर खेळवला जाऊ शकतो. यासाठी डिजिटल स्कोअर बोर्डची तरतूद करण्यात आलेली आहे. फ्लड लाईटस् आणि स्कोअर बोर्ड आकर्षण असेल.

स्टेडियमचे क्रिकेट मैदान ८.१६२ मीटर व्यासाचे तयार करण्यात येणार आहे. पाणी निचरा करण्यासाठी अंडर ग्राउंड ड्रेनेज व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य खेळपट्टीसह चार खेळपट्ट्या करण्यात येणार आहेत. तसेच ४ अद्ययावत धावपट्ट्या करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक असणार आहे.

अंतर्गत रस्ते, पार्किंग व्यवस्था, गेट, संरक्षक भिती, लॅण्डस्केपिंग, बाहेरील बाजूस शोनालये, वृध्द लोकांसाठी वॉकिंग ट्रॅकची तरतूद करण्यात आलेली आहे. क्रीडा रसिकांना व खेळाडूंना पिण्याचे व वापरण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी एक पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे आकर्षक प्रवेशद्वार असणार आहे.

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article