महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

डेव्हिस चषक टेनिस : अर्जेंटिना अंतिम फेरीत

06:49 AM Feb 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ रोसारिओ (अर्जेंटिना)

Advertisement

रविवारी येथे झालेल्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत अर्जेंटिनाने कझाकस्तानचा 3-2 अशा फरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या लढतीत अर्जेंटिनाच्या सेबेस्टियन बाझने कझाकस्तानच्या पोपकोचा परतीच्या एकेरी सामन्यात पराभव केला.

Advertisement

डेव्हिस चषक स्पर्धेतील अन्य लढतीमध्ये बेल्जियम, झेक प्रजासत्ताक आणि फ्रान्स यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदविले. अर्जेंटिना आणि कझाकस्तान यांच्यातील लढतीत परतीच्या एकेरी सामन्यात सेबेस्टियन बाझने कझाकस्तानच्या पोपकोचा 6-4, 3-6, 7-6 (8-6) असा पराभव केला. गेल्या महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत 23 वर्षीय बाझने एकेरीची तिसरी फेरी गाठली होती.

डेव्हिस चषक स्पर्धेच्या अन्य लढतीत बेल्जियमने क्रोएशियावर 3-1 अशी मात करत पुढील फेरीत स्थान मिळविले. बेल्जियमच्या बर्जेसने क्रोएशियाच्या अॅड्युकाव्हिकचा 6-1, 7-5 असा फडशा पाडला.बेल्जियमच्या बर्जेसने या लढतीतील सलामीच्या एकेरी सामन्यात क्रोएशियाच्या सिलीकला पराभूत केले होते. अन्य लढतीत झेक प्रजासत्तकने इस्त्रायलचा 4-0 तर फ्रान्सने तैवानचा 4-0 असा एकतर्फी पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेच्या पात्र फेरी लढतीत 7 देशांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. अमेरिका, ब्राझील, कॅनडा, फिनलँड, जर्मनी, नेदरलँड्स आणि स्लोव्हाकीया या देशांनी पुढील फेरीत स्थान पटकाविले आहे. तसेच 2023 सालातील विद्यमान विजेता इटली तसेच उपविजेता ऑस्ट्रेलिया, वाईल्ड कार्डधारक ब्रिटन आणि स्पेन यांनीही शेवटच्या 16 संघांमध्ये प्रवेश केला आहे. डेव्हिस चषक स्पर्धेच्या विश्व गट प्लेऑफ लढतीत भारताने पाकिस्तानचा 4-0 तसेच ग्रीसने रोमानियाचा 4-0 असा फडशा पाडला.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media#sports
Next Article