महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

डेव्हिस चषक : इटली अंतिम फेरीत

06:17 AM Nov 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सर्बियाचा पराभव, सिनेरची जोकोविचवर मात

Advertisement

वृत्तसंस्था/ मॅलेगा

Advertisement

2023 च्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत येथे खेळविण्यात आलेल्या लढतीत इटलीने बलाढ्या सर्बियाचा 2-1 अशा फरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या लढतीमध्ये इटलीच्या यानिक सिनेरने सर्बियाच्या टॉप सिडेड जोकोविचला पराभवाचा धक्का दिला. शनिवारच्या दिवशी जोकोविचला दोन पराभवांना सामोरे जावे लागले.

डेव्हिस चषक स्पर्धेच्या इतिहासामध्ये इटलीने 1976 साली केवळ एकदाच अजिंक्यपद मिळविले होते. आता इटली आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 28 वेळेला डेव्हिस चषकावर आपले नाव कोरले आहे. गेल्या अकरा दिवसांच्या कालावधीत इटलीच्या सिनेरने चारपैकी तीन सामन्यात जोकोविचला पराभूत करण्याचा पराक्रम केला आहे.

उपांत्य फेरीच्या लढतीतील दुसऱ्या एकेरी सामन्यात सिनेरने जोकोविचचा 6-2, 2-6, 7-5 असा पराभव केला. त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात इटलीच्या सिनेर आणि सोनेगो यांनी सर्बियाच्या जोकोविच व केसमानोविचचा 6-3, 6-4 असा पराभव केला. सिनेरने सलामीच्या एकेरी सामन्यात जोकोविचवर दर्जेदार खेळ करत विजय मिळविला. डेव्हिस चषक स्पर्धेच्या इतिहासामध्ये एकेरीत जोकोविचला पराभूत करणारा सिनेर हा इटलीचा पहिला टेनिसपटू आहे. यापूर्वी म्हणजे 2011 साली या स्पर्धेत अर्जेटिनाच्या मार्टिन डेल पोट्रोने जोकोविचला पराभूत करून जोकोविचची सलग 21 सामन्यातील विजयी घोडदौड रोखली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media#Sport#tennis
Next Article