Ratnagiri News : राजापूर तालुक्याची सून, मालवणची सुकन्या होणार मुंबईची महापौर
01:29 PM Feb 08, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
मुंबई महापौरपदी भाजपकडून रितू तावडे
Advertisement
राजापूर : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून रितू तावडे यांच्मा नावाची घोषणा झालेली आहे.
तावडे या राजापूर तालुक्यातील विल्ये गावच्या सासरवाशीण आहेत.रितू तावडे यांचे पूर्वाश्रमीचे नाव ज्योती चंद्रकांत सावंत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पेंडूर-खरारेवाडी याठिकाणी त्यांचे मूळ घर आहे. महापौरपदासाठी रितू तावडे यांची निवड झाल्याबद्दल विल्ये आणि पेंडूर या दोन्ही गावातून आनंद व्यक्त केला जात आहे
Advertisement
Advertisement