For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेदमूर्ती दत्तात्रेय मुरवणे यांना राष्ट्रीय पंडित पुरस्कार प्रदान

11:49 AM Oct 24, 2024 IST | अनुजा कुडतरकर
वेदमूर्ती दत्तात्रेय मुरवणे यांना राष्ट्रीय पंडित पुरस्कार प्रदान
Advertisement

आचरा | प्रतिनिधी

Advertisement

वैदिक सम्राट् पं. श्रीकृष्णशास्त्री गोडशे गुरुजी राष्ट्रीय पंडित पुरस्कार २०२४ हा मनाचा पुरस्कार मालवण तालुक्यातील वायंगणी येथील वेदमूर्ती वैदिकरत्न दत्तात्रेय मुरवणे गुरुजी यांना देवनाथ मठ, सुर्जी अंजनगाव, महाराष्ट्र चे मठाधिपती श्री श्री 1008 अनंत श्रीविभूषित श्रीनाथपीठाधीश्वर आचार्य सद्गुरु श्रीजितेंद्रनाथ महाराज ह्यांच्या हस्ते नाशिक येथील वैदिक ज्ञान विज्ञान संस्कृत महाविद्यालय(गुरुकुल, वेद पाठशाळा) येथे प्रदान करण्यात आला.

भारतीय संस्कृतीचा आत्मा म्हणजे आपले वेदवाङ्नय आहे. त्यांच्या आराधनेने आपली संस्कृती समृध्द झाली आणि जगद्गुरु पदाला पोहोचली. अखिल मानवाच्या मुलभूत प्रश्नांची उकल वेदाध्ययनाने होते म्हणून ही सनातन परंपरा जपण्याचे आणि संवर्धित करण्याचे पवित्र कार्य गुरु-शिष्य परंपरेने भारतात आणि पाश्चात्य देशात सुरू आहे ही संस्कृती निष्ठेने आणि व्रत म्हणून जपणाऱ्या वेदोपासकांची परंपरा आपल्या देशात आहे, त्या सर्व महापुरूषांना सन्मानित करण्यासाठी वैदिकसम्राट गुरवर्य प. पू पंडित श्रीकृष्णशास्री गोडशे गुरुजी ह्यांच्या सोळाव्या पुण्यस्मरणार्थ प्रतिवर्षां प्रमाणे राष्ट्रीय पंडित पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisement

वायंगणी येथील वेदमूती दत्तात्रेय मुरवणे यांचे शालेय शिक्षण झाल्यानंतर पुणे येथील तांबडी जोगेश्वरी पाठशाळेत वेदमूमूर्ती दिनकरभट्ट माधव फडके गुरुजी घनपाठी यांच्याकडे ऋग्वेवेदाचे दशग्रंथघनांत अध्ययन पूर्ण केले. 1991 व 92 दोन वर्षे नाशिक येथे गुरुगंगेशवर वेदवद्यालयात अध्यापन केले. 1993 पासून वायंगणी जि. सिंधुदुर्ग येथे ऋवेद गुरुकुल सुर करून अध्यापन सुरू केले, आत्तापर्यंत त्यांच्याकडील 14-15 विद्यार्थ्यांनी दशग्रंथ घनांत अध्ययन पूर्ण केले त्यापैकी अनेक विद्यार्थी वेद व शास्र अध्यापनाचे कार्य करीत आहेत. त्यांच्या गुरुकुलात सध्या तीस विद्यर्थी वेदाध्ययन करीत आहेत. त्यांनायापूर्वी मानाचा असा महाराष्ट्र राज्य शासनाचा कवि कुलगुरूकालिदास संस्कृत साधना पुरस्कार प्राप्त झाला आहे त्यानंतर त्याना राष्ट्रीय पंडित पुरस्कार प्राप्त झाल्याने आचरा दशक्रोशीतुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Advertisement
Tags :

.