For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नृसिंहवाडीत आज दत्त जन्मोत्सव सोहळा

01:10 PM Dec 14, 2024 IST | Radhika Patil
नृसिंहवाडीत आज दत्त जन्मोत्सव सोहळा
Datta's birthday celebration today in Nrusinghwadi
Advertisement

नृसिंहवाडी : 
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून शनिवार दि.14 रोजी सायंकाळी 5 वाजता मुख्य मंदिरात दत्तजन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे.त्याची दत्त देवसंस्थान व ग्रामपंचायत मार्फत जय्यत तयारी करणेत आली आहे.

Advertisement

येथील दत्तजयंती सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक,,गोवा ,गुजरात, आदी राज्यातून अनेक भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात.भाविकांना दर्शनाची सोय व्हावी यासाठी येथील श्री नृसिंहसरस्वती स्वामी दत्त देव संस्थान व ग्रामपंचायत मार्फत अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

दत्त जयंती निमित्त दि.14 रोजी येथील दत्त मंदिरात पहाटे 4 वाजता काकड आरती व शोडषोपचार पूजा,सकाळी 7 ते 12 यावेळेत पंचामृत अभिषेक ,दुपारी 12.30 वाजता श्रींचे चरणकमलावर महापूजा ,व भाविकांसाठी महाप्रसाद, दुपारी 3 वाजता येथील ब्रह्मवृंदांकडून पवमान पंचसुक्तांचे पठण होईल.दुपारी 4 नंतर श्री नारायणस्वामी महाराजांचे मंदिरातील श्रींची उत्सवमूर्ती सवाद्य मुख्य मंदिरात आणणेत येईल त्यानंतर 4.30 वाजता ह,..भालचंद्र देव(रा.केज आंबेजोगाई) यांचे सुश्राव्य कीर्तन होऊन सायंकाळी ठीक 5 वाजता दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे.जन्माकाळानंतर पारंपारिक आरती,पाळणा होऊन सुंठवडा प्रसाद वाटणेत येणार आहे.रात्रौ 9 नंतर धूप दीप आरती व पालखी सोहळा होवून रात्रो उशिरा शेजारती होणार आहे.

Advertisement

श्रींचा पाळणा जन्मकाळानंतर उत्सवाचे मानकरी बाळकृष्ण राजोपाध्ये यांचे सुयोग हॉल येथे भाविकांना दर्शनासाठी ठेवणेत येणार आहे. श्री दत्तजयंती उत्सवकाळात महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजराथ, अशा अनेक राज्यातून असंख्य भाविक श्री दत्त दर्शनासाठी येत असलेने भाविकांना दर्शन घेणे सुलभ व्हावे यासाठी दर्शनरांग व्यवस्था, मुखदर्शन, क्लोज सर्किट टीव्ही व्यवस्था, ध्वनीक्षेपक यंत्रणा, सकाळी 10 ते रात्री 10 पर्येंत मोफत महाप्रसाद, कापडी मंडप, शामियाना, आकर्षक विद्युत रोषणाई, आदी आवश्यक सोयी व सुविधा दत्त देव संस्थान मार्फत करणेत आली असून जादा एस टी बसेस सोडणेसाठी राज्य परिवहन मंडळ व गर्दीवर नियंत्रण ठेवणेसाठी आवश्यक पोलीस बंदोबस्तसाठी संपर्क साधनेत आलेचे देवस्थान चे अध्यक्ष वैभव काळूपुजारी व सचिव सोनू उर्फ संजय पुजारी तसेच पार्किंगची नेमकी व्यवस्था, फेरीवाले नियोजन, आरोग्य केंद्र, स्वच्छता, दिवाबत्ती आदी आवश्यक नियोजन करणेत आलेचे सरपंच सौ चित्रा सुतार व उपसरपंच रमेश मोरे यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.