For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माडखोल उपसरपंचपदी दत्ताराम कोळमेकर

05:18 PM Dec 09, 2025 IST | अनुजा कुडतरकर
माडखोल उपसरपंचपदी दत्ताराम कोळमेकर
Advertisement

पाच विरुद्ध सात मतांनी उपसरपंचपदी निवड

Advertisement

ओटवणे |प्रतिनिधी

माडखोल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दत्ताराम उर्फ भाऊ कोळमेकर यांची निवड करण्यात आली आहे. मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच निवडणूक प्रक्रियेत पाच विरुद्ध सात मतांनी त्यांची ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी निवड झाली. त्यामुळे अनिता राऊळ यांना उपसरपंच पदाच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. नवनिर्वाचित उपसरपंच भाऊ कोळमेकर यांचे भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी सभापती तथा जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, भाजपा आंबोली मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ, भारतीय जनता पार्टी बांदा सरचिटणीस मधुकर देसाई, प्रविण देसाई यांनी अभिनंदन केले. यावेळी महेश सारंग यांनी माडखोल विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तर भाऊ कोळमेकर यांनी सर्वांना विश्वासात घेऊन माडखोल गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात असल्याचे सांगितले.यावेळी माडखोल सरपंच श्रुष्णवी राऊळ, माजी सरपंच राजन राऊळ, अनिता राऊळ, बाळु शिरसाट, शक्ती केंद्र प्रमुख अँड सुरेश आडेलकर, भाजपा बुथ अध्यक्ष सिद्धेश शिरसाठ, शैलैश राऊळ, माजी उपसरपंच कृष्णा उर्फ जीजी राऊळ, अनिल परब, ग्रामपंचायत सदस्य संजय देसाई, दीप्ती राऊळ, सरिता राऊळ, कैलास ठाकूर, प्रज्ञा राणे, जान्हवी पाटील, अनिता राऊळ, विजय राऊळ, समृद्धी शिरसाठ, प्रकाश नाईक, रवींद्र राऊळ, विकास म्हाडेश्वर, लखन आडेलकर, लक्ष्मण कोळमेकर, तुकाराम पानोळकर, प्रशांत पानोळकर, रवींद्र चाफेकर, भरत राऊळ, योगेश लाड, संतोष तेली, प्रतिक गवस, गोपाळ गोवेकर, रुमेश ठाकूर, सुयोग राऊळ आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.