भजन स्पर्धेत वैभववाडीचे दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळ प्रथम
माजगाव खालची आळीकर सावंत -भोसले कुटुंबियांचे आयोजन
ओटवणे | प्रतिनिधी
माजगाव येथील ब्राह्मण मंदिरात खालची आळीकर सावंत भोसले कुटुंबियांच्यावतीने सालाबाद प्रमाणे एकादशी सप्ताहानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या खुल्या भजन स्पर्धेत वैभववाडी येथील श्री दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत नेरूर येथील श्री. मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळाने द्वितीय क्रमांक तर सांगेली सनामटेंब येथील श्री सनामदेव प्रासादिक भजन मंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेचा उर्वरीत निकाल पुढीप्रमाणे उत्कृष्ट गायक - अमित तांबोळकर (तांबोळी), उत्कृष्ट तबला - दिपक मेस्त्री (नेरूर), उत्कृष्ट पखवाज -.सागर वारखणकर (कारिवडे), उत्कृष्ट झांज -.भावेश परब (मळगाव), उत्कृष्ट हार्मोनियम - महेश तळगावकर (तांबोळी), उत्कृष्ट कोरस - देव इसोटी प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) या भजन स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार राजन तेली यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच डॉ अर्चना सावंत, सरमळे सरपंच विजय गावडे, चराठा उपसरपंच अमित परब, भाजपा विभागीय अध्यक्ष सचिन बिर्जे, ओटवणे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बुराण, प्रताप सावंत, रुद्राजी भालेकर, गुरुनाथ सावंत, खेम सावंत, संदीप सावंत, विजय मेस्त्री, रामचंद्र सावंत, कुणाल सावंत, मंथन सावंत, अनिकेत सावंत, रामकृष्ण सावंत, नरेश सावंत, मंगेश सावंत, सुभाष सावंत, प्रकाश सावंत आदी उपस्थित होते.या भजन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बंड्या धारगळकर आणि शहाजान शेख काम पाहिले. भजन स्पर्धेचे पारितोषिक खालची आळीकर सावंत भोसले कुटुंबियांच्या उपस्थितीत करण्यात आले.