For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहापूर दत्त मंदिर सेवा प्रतिष्ठानतर्फे दत्त जयंती-वर्धापन दिन

06:24 AM Dec 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
शहापूर दत्त मंदिर सेवा प्रतिष्ठानतर्फे  दत्त जयंती वर्धापन दिन
Advertisement

बेळगाव :

Advertisement

महात्मा फुले रोड शहापूर येथील दत्त मंदिर सेवा प्रतिष्ठानतर्फे दत्त जयंती व वर्धापन दिन अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंगळवार दि. 2 रोजी सकाळी 9 वाजता स्वामीयाग करण्यात आला. महेश ग्रामोपाध्ये यांनी पौरोहित केले. वर्धापनदिनानिमित्त दत्त मूर्तीची फुलांनी विशेष आरास करण्यात आली होती. दुपारी 1 वाजता महाप्रसादाला प्रारंभ झाला. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

आज महाअभिषेक

Advertisement

गुरुवार दि. 4 रोजी सकाळी 7.15 वा. महाअभिषेक व सायंकाळी 6.15 वा. दत्त गुरुंचा पाळणा व रात्री 8 वाजता भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

Advertisement
Tags :

.