For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेच्या एआय लॅबमधून होतेय डाटाचोरी

06:41 AM May 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेच्या एआय लॅबमधून होतेय डाटाचोरी
Advertisement

चिनी कंपन्यांवर गंभीर आरोप : अँथ्रोपिकची ट्रम्प प्रशासनाकडे तक्रार

Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

चिनी कंपन्या एआय स्टार्टअप डीपसीक अमेरिकेच्या आर्टिफिशियल इंटेलिजेन्स लॅबमधून डाटा चोरण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असल्याचा आरोप अमेरिकेच्या विदेश विभागाने केला आहे. याकरता जगभरातीर राजनयिक आणि दूतावासांना पाठविण्यात आलेल्या एका केबलद्वारे अमेरिकेच्या एआय मॉडेलमधून माहिती मिळविणे आणि त्यांना डिस्टिल करण्याशी निगडित चिंतांवर संबंधित देशांच्या अधिकाऱ्यांसोबत बोलण्याचा निर्देश मुत्सद्यांना देण्यात आला आहे. डिस्टिलेशनमध्ये मोठ्या आणि अधिक महाग एआय मॉडेल्सद्वारे प्राप्त आउटपूटचा वापर करून छोट्या एआय मॉडेल्सना प्रशिक्षित केले जाते. एक नव्या आणि शक्तिशाली एआय टूलला प्रशिक्षित करण्याचा खर्च कमी करण्यासाठी असे केले जाते.

Advertisement

अँथ्रोपिकची तक्रार

जगभरातील दिग्गज एआय कंपनी अँथ्रोपिकने तीन प्रमुख चिनी एआय कंपन्यांवर प्रतिस्पर्धी मॉडेलला गुप्त स्वरुपात प्रशिक्षित करण्यासाठी आमच्या क्लॉड चॅटबॉटचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्याचा आरोप करणारी तक्रार केली आहे. यानंतरच अमेरिकेच्या प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. चिनी लॅब्स डीपसीक, मूनशॉट एआय आणि मिनीमॅक्सने कॉर्पोरेट कायद्याचे उल्लंघन करत आमच्या क्लॉड एआय टूलसोबत छेडछोड केल्याचा आरोप अँथ्रोपिकने केला आहे. ‘मूनशॉट एआय’चे सीईओ आणि संस्थापक जिलिन यांग यांनी एनवीडियाचा वर्षातील सर्वात मोठा कार्यक्रम ‘जीटीसी 2026’मध्ये एक वक्ता म्हणून सहभाग घेतला होता. आता याच कंपनीवर अँथ्रोपिक आणि अमेरिकेच्या प्रशासनाने आरोप केला आहे.

मूनशॉट एआयवर गंभीर आरोप 

आम्ही 3 एआय प्रयोगशाळा डीपसीक, मूनशॉट आणि मिनीमॅक्सकडून क्लॉडच्या क्षमतांना अवैध स्वरुपात मिळवत स्वत:च्या मॉडेलला प्रभावी करण्यासाठीच्या औद्योगिक स्तराच्या अभियानांची ओळख पटविली असल्याचे अँथ्रोपिकने स्वत:च्या ओपन ब्लॉगमध्ये म्हटले आहे. या लॅब्सनी आमच्या सेवा अटी आणि क्षेत्रीय पोहोच निर्बंधांचे उल्लंघन करत जवळपास 24 हजार बनावट खात्यांच्या माध्यमातून क्लॉडसोबत 1.6 कोटीहून अधिक वेळा संवाद साधला असल्याचे अँथ्रोपिकने म्हटले आहे.

बनावट खात्यांचा वापर

तक्रारीत मूनशॉट एआयकडून वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचे वर्णनही करण्यात आले आहे. तिन्ही डिस्टिलेशन अभियानांनी एकसारखीच रणनीति अवलंबिली, ज्यात बनावट खाती आणि प्रॉक्सी सेवांचा वापर करत मोठ्या प्रमाणावर क्लॉडपर्यंत पोहोच निर्माण करण्यात आली आणि ओळख लपविण्यात आली. त्यांच्या प्रॉम्ट्सचे प्रमाण, संरचना आणि फोकस सामान्य वापराच्या पॅटर्नपेक्षा अत्यंत वेगळा होता, जो वैध वापराऐवजी जाणूनबुजून क्षमता निष्कर्षणाला दर्शवितो. मूनशॉट एआयचा 34 लाखाहून अधिक वेळा इंटरॅक्शन नोंदविला गेला असल्याचे अँथ्रोपिककडून सांगण्यात आले.

ऑपरेशनचे मुख्य लक्ष्य

एजेंटिक रीजनिंग आणि टूलचा वापर

कोडिंग आणि डाटा विश्लेषण

कॉम्प्युटर-यूज एजंट डेव्हलपमेंट

कॉम्प्युटर व्हिजन

-मूनशॉटच्या किमी मॉडेलने अनेक वेगवेगळ्या पद्धतींनी पोहोच निर्माण करण्यासाठी शेकडो बनावट खात्यांचा वापर केला.

-वेगवेगळ्या प्रकारच्या खात्यांनी या अभियानाला एक समन्वित  ऑपरेशनच्या रुपात ओळखणे अवघड करून सोडले.

-अँथ्रोपिकने रिक्वेस्ट मेटाडाटाच्या माध्यमातून या ऑपरेशनचा शोध लावला, जे मूनशॉटच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या पब्लिक प्रोफाइला जुळणारा होता.

-मूनशॉटने अधिक लक्ष्यित दृष्टीकोनाचा वापर केला, ज्यात क्लॉडच्या रीजनिंग ट्रेसेसला मिळविणे आणि नंतर ते पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला.

Advertisement
Tags :

.