महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दसपटकर शिंदे बंधुंचा प्रो कबड्डीमध्ये दबदबा!

06:00 AM Nov 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शुभम शिंदे पटना पायरेट्सकडून, आदित्य बंगाल वॉरियर्सकडून गाजवतोय मैदान

Advertisement

राजेंद्र शिंदे/चिपळूण

Advertisement

कबड्डीची पंढरी समजल्या जाणाऱ्या चिपळूण तालुक्यातील कबड्डीपटूंसाठी प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या निमित्ताने सोनियाचा दिवस उजाडला आहे. या कबड्डी स्पर्धेत आतापर्यंत चिपळूणच्या आणि विशेषत: दसपटीतील असंख्य खेळाडूंनी आपला दबदबा निर्माण केला आहे. आता त्यामध्ये अधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे दसपटकर शुभम शिंदे आणि त्याचा भाऊ आदित्य शिंदे. यामध्ये शुभम हा पटना पायरेट्स संघाच्या कर्णधार म्हणून तर त्याचा भाऊ आदित्य हाही बंगाल वॉरियर्सकडून एकाचवेळी स्पर्धेत खेळत आहे.

मुंबईसह देशभरात विविध आठ ठिकाणी खेळली जाणारी प्रो कबड्डीलीग स्पर्धा रंगतदार होत आहेत. या स्पर्धेत देश-विदेशातील खेळाडूंचा सहभाग असल्याने त्यांचा थरारक खेळ पाहता येत आहे. वास्तविक कबड्डीकडे व्यावसायिक दृष्टीकोन नसल्याने या रांगड्या खेळाची पीछेहाट होत असल्याचे सगळेच मानत होते. मात्र आता आयपीएलच्या धर्तीवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्यापासून साहजिकच कबड्डीसह खेळाडूंनाही चांगले दिवस आले आहेत. मुळातच कबड्डी म्हटलं की, चिपळूणचं नाव पुढं येतं. चिपळूण आणि कबड्डी यांचे नाते अतुट आहे. या तालुक्यातून विशेषत: दसपटीतून अर्जुन पुरस्कार विजेते अशोक शिंदे यांच्यासह कबड्डीतील अनेक रत्न महाराष्ट्राला पर्यायाने देशाला लाभले आहेत. सद्यस्थितीत राज्यातील अनेक व्यावसायिक कबड्डी संघात अनेक खेळाडू खेळत आहेत. तर अशोक शिंदे, दशरथ शिंदे, प्रताप शिंदे यांनी तर नामवंत संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळलेली आहे. सध्याच्या प्रो कबड्डी स्पर्धेच्या हंगामात शुभम शिंदे, आदित्य शिंदे या दसपटकरांबरोबरच अजिंक्य पवार असे तिघे चिपळूणकर खेळत आहेत.

चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी गावचा शुभम शिंदे याने गेल्या काही वर्षात प्रो कब•ाrमध्ये आपले स्थान अधिक बळकट केले आहे. 2017 पासून ज्युनियर नॅशनल स्पर्धा खेळायला सुऊवात केलेल्या शुभमने सलग तीन वर्षे राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या खेळाची चुणूक दाखवली. यामुळेच वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत 2020, 2022, 2024 मध्ये खेळून कब•ाr स्पर्धेत आपले अस्तित्व सिद्ध केले. तत्पूर्वी स्थानिक संघ वाघजाई कोळकेवाडी संघाकडून खेळताना कबड्डी खेळाला सुऊवात केली. स्थानिक स्पर्धांमध्येही शुभमने आपल्या खेळाने क्रीडा रसिकांची वाहवा मिळवली. सध्या तो सेंट्रल रेल्वेमध्ये तिकीट तपासनीस म्हणून नोकरीला आहे. त्याची दोनवेळा भारतीय शिबिरात निवड झाली. प्रो कबड्डीमध्ये त्याने पुणेरी पलटण संघातून खेळायला सुऊवात केली व दोन वर्ष त्याच संघाकडून खेळला. नंतर पटना पायरेट्स संघाकडून व नंतर दोन वर्षे बंगाल वॉरियर्स संघाकडून व आता पुन्हा पटना पायरेट्स संघाकडून खेळतांना त्याची कर्णधार म्हणून निवड झाली आहे.

आदित्यने 67 वर्षानंतर प्रथमच मिळवून दिले अजिंक्यपद

शुभमचा भाऊ आदित्य हाही उत्कृष्ट कबड्डीपटू आहे. आदित्यने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत रत्नागिरी जिह्याचे कर्णधारपद भूषवताना 67 वर्षानंतर प्रथमच जिल्ह्याला अजिंक्यपद मिळवून दिले होते. आता शुभम व आदित्य हे वाघजाई कोळकेवाडी संघाचे प्रतिनिधीत्व करीत असताना जिह्यात, तसेच पुणे-मुंबई येथे या संघाने अजिंक्यपदावर आपले नाव कोरून संघाचा दबदबा कायम ठेवला आहे. शुभम व आदित्य यांना मागील वर्षी प्रो कबड्डीमध्ये एकाच संघाकडून म्हणजे बंगाल वॉरियर्सकडून खेळण्याची संधी मिळाली. प्रो कबड्डीमध्ये दोघे सख्खे भाऊ एकाच संघातून खेळताना प्रथमच पहावयास मिळाले. सध्या आदित्य हा बंगाल वॉरियर्स या संघाकडून खेळत आहे.

आमचा आनंद द्विगुणित झाला: शशिकांत शिंदे

शुभम, आदित्यचे वडील शशिकांत शिंदे हे निवृत्त सैनिक आहेत. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांबाबत बोलताना सांगितले की, या दोघांनाही लहानपणासूनच कबड्डी खेळाची आवड आहे. त्यासाठी त्यांना आम्ही प्रोत्साहन दिले. यामुळे आता दोघे कबड्डी या क्षेत्रात नाव कमवून आहेत. आता तर शुभम हा पाटणा पायरेट्स व आदित्य हा बंगाल वॉरियर्स संघाकडून खेळत आहे. विशेषत: प्रो कबड्डीमध्ये एका मोठ्या संघाचे कर्णधारपद शुभमला मिळाल्याने आमचा आनंद द्विगुणित झालेला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article