ओटवणे येथील दशरथ गावकर यांचे निधन
ओटवणे | प्रतिनिधी
ओटवणे गावठणवाडी येथील दशरथ राजाराम गावकर (६६) यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. शांत, मनमिळाऊ स्वभाव व परोपकारी स्वभाव असलेल्या दशरथ गावकर यांच्या आकस्मित निधनाचा गावकर कुटुंबीयांसह सर्वांनाच धक्का बसला. शनिवारी सकाळी ८ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नोकरीसाठी मुंबई गाठलेले दशरथ गावकर अंधेरी चांदिवली येथे राहत. अंधेरी शिप येथील गोल्डियम डायमंड कंपनीत ते हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या कामाला होते. ओटवणे ग्रामस्थ मंडळा (मुंबई) चे ते खजिनदार होते. मंडळाच्या उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. मुंबई मंडळासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. गावी आल्यानंतर सध्या ते मंडळाचे ओटवणे संपर्कप्रमुख होते. गावातील धार्मिक व सामाजिक कार्यात तसेच नियोजनात ते अग्रस्थानी असायचे.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुन, भाऊ, भावजय, पुतण्या, बहिण असा परिवार आहे. मुंबईस्थित प्रतीक आणि प्रथमेश गावकर यांचे ते वडील तर मुंबईस्थित महादेव गावकर यांचे ते भाऊ होत.