तळवडेत ५ एप्रिलपासून दशावतारी नाट्य महोत्सव
न्हावेली /वार्ताहर
स्व.प्रकाश परब फाऊंडेशन,देवस्थान व्यवस्थापन समिती समस्त गांवकर व तळवडे ग्रामस्थ आयोजित श्री देवी सातेरी मंदिरा तळवडे भव्य पटंगणावर ५ एप्रिल ते १३ एप्रिल पर्यंत संध्याकाळी ६ वाजल्यापासून मूळ पारंपारिक दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार ५ रोजी बाळकृष्ण गोरे पारंपरिक दशावतार लोककला नाट्य मंडळ,कवठी यांचा ' घटस्थापना ' नाट्यप्रयोग सोमवार ६ रोजी नाईक मोचेमाडकर पारंपरिक दशावतार लोकनाट्य मंडळ,मोचेमाड वेंगुर्ला यांचा ' नागनिलमणी ' नाट्यप्रयोग मंगळवार ७ रोजी पार्सेकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ,वेंगुर्ला यांचा ' गोमय वज्रांगधारी ' नाट्यप्रयोग बुधवार ८ रोजी आजगावकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ,आजगाव यांचा 'नारायणी महाकालेश्वर ' नाट्यप्रयोग गुरुवार ९ रोजी वालावलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ,वालावल यांचा ' देवी हनुमंतेश्वरी ' नाट्यप्रयोग शुक्रवार १० रोजी मामा मोचेमाडकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ,मोचेमाड यांचा 'रेवणनाथ ' शनिवार ११ रोजी चेंदवणकर गोरे पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ,कवठी यांचा ' क्षणमुखासूर रुपिणी संहार ' नाट्यप्रयोग रविवार १२ रोजी खानोलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ,खानोली यांचा ' असूर मर्दिनी पुण्याक्षी ' नाट्यप्रयोग सोमवार १३ रोजी आरोलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ,आरवली यांचा ' पुष्कर्णी तीर्थ ' नाट्यप्रयोग होणार आहे.