रेडी येथे १० एप्रिलपासून दशावतारी नाट्य महोत्सव
खासदार नारायण राणेंच्या वाढदिवसाचे औचित्य
रेडी (प्रतिनिधी)-
माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रितेश राऊळ मित्रमंडळ पुरस्कृत आणि दशावतार कला प्रेमी ग्रुप-रेडी यांच्या वतीने दि. 10 ते 14 एप्रिल कालावधीत रेडी ग्रामपंचायत नजिकच्या पटांगणावर भव्य दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या दशावतारी नाट्यमहोत्सवात गुरुवार दि. 10 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वाजता 'माहावीर बरबरीक' मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळ मोरे, कुडाळ, शुक्रवार दि.11 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वाजता 'पुत्र झाला दगड' श्री देवी माऊली दशावतार नाट्य मंडळ इन्सुली, शनिवार दि. 12 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वाजता 'देवी कुस्मांडा' ओंकार नटेश्वर दशावतार नाट्य मंडळ, कालेली, रविवार दि. 13 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वाजता 'राजा गोपीचंद' आजगावकर दशावतार नाट्य मंडळ, आजगाव, सोमवार दि. 14 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वाजता 'दंभासुर शिवतेज हरण' तेंडोलकर दशावतार नाट्य मंडळ, झाराप, अशी दशावतारी नाटके होणार आहेत. याचा लाभ रसिकांनी बहुसंख्येने घ्यावा असे आवाहन प्रितेश राऊळ मित्रमंडळ व दशावतार कला प्रेमी ग्रुप-रेडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.