For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

10 एप्रिल पासून कुडाळात दशावतार नाट्य महोत्सव

12:54 PM Apr 03, 2026 IST | अनुजा कुडतरकर
10 एप्रिल पासून कुडाळात दशावतार नाट्य महोत्सव
Advertisement

खा .नारायणराणेंच्या वाढदिवसानिमित सांगिर्डेवाडी येथे आयोजन

Advertisement

कुडाळ -

भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित विनायक राणे मित्र मंडळ व सांगिर्डेवाडी ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 10 ते 16 एप्रिल या कालावधीत दशावतार नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे कुडाळ - सांगिर्डेवाडी येथील श्री महापुरुष गणपती मंदिर येथे हा महोत्सव होणार आहे. रोज सायंकाळी 7 वाजता नाटकाला प्रारंभ होईल.या महोत्सवात सादर करण्यात येणारी मंडळे व कथानक पुढील प्रमाणे आहेत. 10 एप्रिल रोजी आजगावकर दशावतार मंडळ (आजगाव ) यांचे *नारायणी कालेश्वर" , 11 रोजी बाळकृष्ण गोरे दशावतार मंडळ (कवठी ) यांचे "कवडी मोल धन" 12 रोजी कै.बाबी कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार मंडळ (नेरूर ) यांचे "कर्म प्रकोप" ,13 रोजी खानोलकर दशावतार मंडळ ( खानोली ) यांचे असुरमर्दिनी पुण्याश्री अर्थात शस्त्रदान,14 रोजी नाईक मोचेमाडकर दशावतार मंडळ ( मोचेमाड - वेंगुर्ले ) यांचे नील माधव, 15 रोजी आरोलकर दशावतार मंडळ ( आरवली ) यांचे "पुत्र नवसाचा" ,16 रोजी देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार मंडळ ( चेंदवण ) यांचे ट्रिकसीनयुक्त पतिव्रत्य तेज अर्थात महिमा शिवचक्र तीर्थाचा नाटक होणार होणार आहे. नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विनायक राणे मित्रमंडळ तसेच सांगिर्डेवाडी ग्रामस्थ मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.