कणकवलीत ५ एप्रिलपासून दशावतार नाट्य महोत्सव
खासदार नारायण राणेंच्या वाढदिवसाचे औचित्य
प्रतिनिधी / कणकवली
माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली येथे भव्य दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ५ ते ९ एप्रिल या कालावधीत दररोज सायंकाळी ७.३० वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.दशावतार ही कोकणातील पारंपरिक लोककला असून या कार्यक्रमामुळे कणकवली परिसरातील नागरिकांना सलग सहा दिवस दर्जेदार नाट्यप्रयोग पाहण्याची संधी मिळणार आहे. या महोत्सवात विविध नामांकित दशावतार नाट्यमंडळे आपले सादरीकरण करणार आहेत.यामध्ये रविवार ५ एप्रिल रोजी देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ चेंदवण, ६ रोजी सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर, ७ रोजी नितीन आसियेकर प्रस्तुत श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ (मळगाव), नाटक - यक्ष मोहिनी, ८ रोजी नाथा नालंग प्रस्तुत वालावलकर दशावतार नाट्य मंडळ वालावल (ओसरगाव), नाटक - देवी हनुमंतेश्वर, ९ रोजी मोरेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ मोरे, ता. कुडाळ, नाटक - दिले दानं सौभाग्याचे.या कार्यक्रमाचे आयोजन माजी जि. प. अध्यक्ष, विद्यमान जि. प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत आणि माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ, कणकवलीच्या वतीने करण्यात आले आहे.