तेंडोली हनुमान मंदिरात ८ पासून दशावतार नाट्य महोत्सव
वार्ताहर/कुडाळ
तेंडोली-खरावतेवाडी येथील हनुमान मंदिरात श्री वावळेश्वर हनुमान सेवा मंडळा च्यावतीने 8 ते 12 एप्रिल या कालावधीत दशावतारी नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सर्व नाटके रात्री 8 वाजता होणार आहेत.8 रोजी चेंदवणकर गोरे दशावतार मंडळ (कवठी) यांचे 'ब्रह्मशाप' नाटक, 9 रोजी अमृतनाथ दशावतार मंडळ (म्हापण) यांचे 'लेक माझी तुळजाभवानी' नाटक,10 रोजी जय संतोषी माता दशावतार मंडळ (मातोंड) यांचे 'कृष्ण कवच' नाटक, 11 रोजी चेंदवणकर दशावतार मंडळ (चेंदवण) यांचे 'दोन आत्म्याचे लग्न' नाटक, 12 रोजी सकाळी ६ वाजता हनुमान जन्म, किर्तनकार-रमेश प्रभू यांचे किर्तन, दुपारी १२ वाजता सत्यनारायण महापूजा, तीर्थप्रसाद, सायंकाळी ५ वाजता स्थानिकांची भजने, ७ वाजता महाआरती, रात्री ८ वाजता पालखी प्रदक्षिणा, ९.३० वाजता श्री वावळेश्वर दशावतार मंडळ (तेंडोली) यांचे नाटक होणार आहे.तसेच 7 रोजी सायंकाळी 7.30 वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छावा' हा हिंदी चित्रपट (एलईडी स्क्रीनवर ) दाखविण्यात येणार आहे.उपस्थित राहण्याचे आवाहन श्री वावळेश्वर हनुमान सेवा मंडळ (तेंडोली) च्यावतीने करण्यात आले आहे.