For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त सह्याद्री फाउंडेशनतर्फे दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन

संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त सह्याद्री फाउंडेशनतर्फे दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन
Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी : सह्याद्री फाउंडेशनचे माजी अध्यक्ष श्री.संजु परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्या दिनांक. 19 ऑगस्टला सावंतवाडी येथील श्री गोविंद चित्र मंदिर मध्ये सायंकाळी सात वाजता सह्याद्री फाउंडेशनच्या माध्यमातून 'सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळ दोडामार्ग' यांचा 'कृष्ण हनुमान युद्ध' हा नाट्यप्रयोग होणार आहे. प्रसिद्ध दशावतार कलाकार केशव खांबल, यश जळवी, संतोष गावस, सचिन कोचरेकर, रवी राणे, अमित गवस, सुखदेव राऊळ, विठ्ठल गावकर, लक्ष्मण परब, नवनाथ गवस, भगवान नाईक आधी कलाकारांचा समावेश असेल. तरी सर्व नाट्यप्रेमी मंडळींनी 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता गोविंद चित्र मंदिर या ठिकाणी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुनिल राऊळ, आणि विद्यमान अध्यक्ष रविंद्र मडगावकर यांनी केलेले आहे.
सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 19 ऑगस्टला सायंकाळी सात वाजता दशावतार नाटक झाल्यानंतर माजी अध्यक्ष संजू परब यांचा सत्कार तसेच विविध गुण गौरव तसेच सदस्यांचा सत्कार होणार आहे. तर 20 ऑगस्टला कलंबिस्त व कुणकेरी माध्यमिक शाळेत जवळपास 300 सुपारीची झाडे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत. यातून 'वृक्ष संवर्धन व जतन' हे अभियान राबवण्यात येत आहे. तरी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.