महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दर्शनला बळ्ळारी कारागृहात हलविणार

06:21 AM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

न्यायालयाची परवानगी : रेणुकास्वामी खून प्रकरणातील अन्य आरोपी विविध कारागृहांत

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

चित्रदुर्गमधील रेणुकास्वामी याच्या खून प्रकरणी बेंगळूरच्या परप्पन अग्रहार कारागृहात असणाऱ्या कन्नड अभिनेता दर्शनला बळ्ळारी मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात येणार आहेत. दर्शनला बळ्ळारीतील कारागृहात हलविण्यास बेंगळूरमधील 24 व्या एसीएमएम न्यायालयान संमती दर्शविली आहे.

अभिनेता दर्शनची परप्पन अग्रहार कारागृहात शाही बडदास्त ठेवण्यात येत असल्याचा फोटो रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे कारागृह अधिकाऱ्यांविषयी संताप व्यक्त झाला आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत कारागृह खात्याने परप्पन अग्रहार कारागृहातील 9 अधिकाऱ्यांना निलंबित केले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दर्शनाला अन्य कारागृहात हलविण्याचा आदेश दिला. त्यानुसार मुख्य कारागृह अधीक्षकांनी दर्शनसह सर्व आरोपींना विविध कारागृहांमध्ये हलविण्यास परवानगी देण्याची विनंती केली. याची न्यायालयाने सकारात्मक दखल घेतली. दर्शनला बळ्ळारी कारागृहातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायाधीशांसमोर हजर करण्याची व्यवस्था आहे.

रेणुकास्वामी खून प्रकरणातील अन्य आरोपी पवन, राघवेंद्र, नंदीश यांना म्हैसूर कारागृहात, जगदीश याला शिमोगा कारागृहात हलविण्यात येणार आहे. धनराज याला धारवाड कारागृहात, नागराजला कलबुर्गी कारागृहात, लक्ष्मण याला शिमोगा तर प्रदोश याला बेळगावमधील हिंडलगा कारागृहात हलविण्यात येणार आहे.

दर्शनची प्रेयसी पवित्रा गौडा, अनुकुमार, दीपक यांना परप्पन कारागृहातच ठेवण्यात येणार आहे. प्रकरणातील अन्य आरोपी रवी, कार्तिक, निगाल व केशवमूर्ती यांना यापूर्वीच तुमकूर कारागृहात नेण्यात आले होते. दरम्यान पवित्राने जामिनासाठी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी न्यायालयाने 28 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article