For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

परूळे विद्यामंदिरच्या दर्शन सामंतचे फेरतपासणीत वाढले गुण

02:58 PM Jun 19, 2025 IST | अनुजा कुडतरकर
परूळे विद्यामंदिरच्या दर्शन सामंतचे फेरतपासणीत वाढले गुण
Advertisement

परूळे प्रतिनिधी

Advertisement

वेंगुर्ले तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या प्रशालेचा विद्यार्थी कु. दर्शन सुंदर सामंत याने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी फेब्रुवारी २०२५ उत्तरपत्रिकेच्या पुनर्मुल्यांकनासाठी (फेरतपासणीसाठी) अर्ज केला होता. या पुनर्मुल्यांकनानंतर आठ गुण वाढल्याने त्याचे एकूण गुण ५०० पैकी ४८५ गुण (९७.००%) झाले आहेत. फेरतपासणीनंतर त्याचे गुण वाढल्याने तो वेंगुर्ले तालुक्यामध्ये मुलग्यांमध्ये प्रथम, पाट परीक्षा केंद्रामध्ये प्रथम आला आहे. पुनर्मूल्यांकनापूर्वी त्याला ९५.८०% गुण होते. पुनर्मुल्यांकनानंतर त्याचे मराठी, हिंदी व समाजशास्त्र या विषयांचे गुण वाढले आहेत. परुळेसारख्या ग्रामीण भागातील माध्यमिक शाळेच्या दर्शनने मिळवलेले हे यश उल्लेखनीय आहे. दर्शनच्या या उल्लेखनीय यशाबद्दल या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष अविनाश देसाई, संस्था उपाध्यक्ष डॉक्टर उमाकांत सामंत, संस्था सीईओ अमेय देसाई, मुख्याध्यापक सचिन माने, पालक, ग्रामस्थ यांनी दर्शन, दर्शनचे पालक व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.