अंबाबाईचे दर्शन शनिवारी बंद ! गाभाऱ्यातील स्वच्छतेमुळे निर्णय
जिल्हाधिकाऱ्यांकडून मंदिरातील गरूड मंडपाच्या जागेची पाहणी
कोल्हापूर प्रतिनिधी
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराची स्वच्छता सोमवारपासून सुरू करण्यात आली. याचाच एक भाग म्हणून शनिवार, 28 रोजी एकादशीचे औचित्य साधून अंबाबाईच्या गाभाऱ्याची स्वच्छता केली जाणार आहे. त्यामुळे सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत गाभाऱ्याचा दरवाजा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत देवीचे दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते आय स्मार्ट कंपनीच्या उपकरणांचे पूजन कऊन मंदिर स्वच्छता कामाला सुऊवात केली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती सचिव शिवराज नाईकवाडे, अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, कंपनीचे संजय माने, मंदिर स्वच्छता निरीक्षक कपिल पाटील आदी उपस्थित होते. यानंतर येडगे यांनी गऊड मंडपाच्या मोकळ्dया जागेची पाहणी केली.
मनिकर्णिका कुंडाची साफसफाई...अवजड घंटेची स्वच्छता...
देवस्थान समितीकडून अंबाबाई मंदिरातील मनिकर्णिका कुंडाच्या साफसफाई कामाला सुऊवात करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी दिवसभर कुंडातील झुडपे हटवण्याचे काम केले. तसेच आय स्मार्ट फॅसिटेक कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मंदिराच्या घाटी दरवाजावरील 800 किलो घंटेची स्वच्छता केली.