महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दर्शनला अंतरिम जामीन मंजूर

06:27 AM Oct 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

131 दिवसांनंतर कारागृहातून मुक्तता : पाठदुखीमुळे त्रस्त असल्याने उपचारासाठी सहा आठवडे जामीन

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

चित्रदुर्गमधील रेणुकास्वामी याच्या खून प्रकरणी कन्नड अभिनेता दर्शन याला उच्च न्यायालयाने बुधवारी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पाठदुखीमुळे त्रस्त असल्याने उपचारासाठी त्याला न्यायालयाने सहा आठवड्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे 131 दिवसांनंतर दर्शन कारागृहातून मुक्त झाला आहे. 2 लाख रुपयांचा बॉण्ड, दोघांची हमी, पासपोर्ट न्यायालयात जमा करणे, साक्षीदारांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष धमकावू नये, एका आठवड्यात वैद्यकीय शिफारसीचा अहवाल सादर करणे.

पुरावे नष्ट करू नये, साक्षीदारांशी संपर्क साधू नये, जामिनाचा दुरुपयोग करू नये या अटींवर दर्शनना उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. दर्शनच्या वकिलांनी बेंगळूरमधील 57 व्या सीसीएच न्यायालयात जामिनासाठी असणाऱ्या अटींची पुर्तता केली आहे. उच्च न्यायालयाचे न्यामूर्ती जयशंकर यांनी ई-मेलद्वारे दर्शनच्या जामिनाची प्रत बळ्ळारी कारागृहाला पाठविण्याची सूचना दिली. कारागृह अधिकाऱ्यांना जामिनाची प्रत मिळताच सायंकाळी दर्शनची बळ्ळारी कारागृहातून मुक्तता करण्यात आली. यावेळी कारागृहाबाहेर दर्शनच्या चाहत्यांची गर्दी उसळली होती. पत्नी विजयलक्ष्मीसोबत दर्शन कारने बेंगळूरमध्ये परतला.

अंतरिम जामीन मिळताच दर्शनच्या चाहत्यांनी बेंगळूरमध्ये जल्लोष केला. त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी बळ्ळारी कारागृहाबाहेर चाहत्यांनी दर्शनचा जयघोष केला. पाठदुखीमुळे त्रस्त असलेल्या दर्शनला म्हैसूरमधील खासगी इस्पितळात उपचार घ्यावे लागणार असल्याची बाब वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, रेणुकास्वामी खून प्रकरणाची सुनावणी करत असलेल्या बेंगळूरमधील 57 व्या सीसीएच न्यायालयाच्या कार्यकक्षेबाहेर जाऊ नये, असा आदेश उच्च न्यायालयाने दिल्यामुळे दर्शनला बेंगळूरमध्येच उपचार घ्यावे लागणार आहे.

दर्शनच्या वकिलांची प्रतिक्रिया

दर्शनला केवळ अंतरिम जामीन मिळाला आहे. नियमित जामीन मिळण्यासाठी कायदेशीर लढा सुरू ठेवावा लागणार आहे. दर्शनला पाठदुखीचा तीव्र त्रास होत आहे. 2022 पासून ही समस्या आहे. न्यायालयाने वैद्यकीय अहवाल देण्याची सूचना दिल आहे. काही अटींवर अंतरिम जामीन मंजूर झाला आहे, अशी प्रतिक्रिया दर्शनचे वकील सुनील यांनी दिली आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी?

प्रेयसी पवित्रा गौडा हिला अश्लील संदेश पाठविल्याने संतप्त झालेल्या दर्शनने चित्रदुर्गमधील रेणुकास्वामी याला साथीदारांमार्फत बेंगळूरला आणून जबर मारहाण केली होती. 9 जून रोजी घडलेल्या या घटनेत रेणुकास्वामीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दर्शनला 11 जून रोजी अटक झाली होती. त्याची प्रेयसी पवित्रा गौडा हिच्यासह अन्य काही जणांनाही पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात दर्शन दुसरा आरोपी आहे. बेंगळूरच्या परप्पन अग्रहार कारागृहात दर्शनची शाही बडदास्त ठेवण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याला मागील 63 दिवसांपासून बळ्ळारी मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर दर्शनने उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. दरम्यान पाठदुखीचा त्रास होत असल्याने त्याला सहा आठवड्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article