महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दर्शन मात्रे मन...

06:22 AM Jan 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आरतीमधल्या या ओळी ऐकल्या की नुसत्या दर्शनाने मनाची कामना पूर्ण होते असाच अर्थबोध होत होता. परंतु एक जुना चित्रपट पाहताना लक्षात आलं की एखादा राजा जेव्हा महालाबाहेर पडायचा त्या वेळेला राजाच्यासमोर शुभचिन्ह किंवा शुभ शकुन, कृती केल्या जायच्या. पाण्याचा घडा डोक्यावर घेतलेली एखादी सौभाग्यवती स्त्राr मुद्दाम त्याच्या समोरून आणली जायची. म्हणजे राजाचं सगळं काम हे सहज सोपं आणि भाग्यदायी व्हावं अशी त्याच्यामागची कामना असायची. असं दर्शन मुद्दाम घडवल्यामुळे नेमकं कोणती कामना पूर्ण होते हे मात्र नंतर ठरायचे. म्हणजेच कोणत्याही गोष्टीचे दर्शन होणं किंवा न होणं यामागे आमचे अनेक आडाखे बांधले जायचे. आपणसुद्धा आपल्याला नको असलेली व्यक्ती डोळ्यासमोर आली तर आपण तिच्याकडे बघायचं टाळतो किंवा किंबहुना भेटायचं टाळतो परंतु काही व्यक्तींना मात्र आपण आवर्जून जाताना भेटूनच बाहेर पडतो. याचं कारणच आम्हाला नुसत्या डोळ्यांनी दर्शन होण्यापेक्षा अनेक गोष्टी मनानेच आधी ठरवलेल्या असतात. म्हणूनच ‘दर्शन मात्रे मन’ असं म्हणत असावेत. आम्ही रोज देवाचे दर्शन घेतो. खरंतर देवाची मूर्ती तीच असते पण तरीही आम्ही देवाच्या समोर उभे राहून पुन्हा नेमकं कशाचं दर्शन घेतो, तेच आमच्या लक्षात येत नाही. आम्हाला आमचे संत नेहमी सांगतात ‘मूर्तीकडे बघण्यापेक्षा मूर्तीतून बघता आलं पाहिजे’. म्हणजेच या मूर्तीच्या पलीकडे असलेलं ब्रह्मांड आम्हाला दिसलं पाहिजे. असं ब्रम्हांड आम्हाला एरवीसुद्धा पाहता येतं. डोळे गच्च मिटल्यानंतर डोळ्यासमोर तारे चमकायला लागतात आणि सगळं ब्रह्मांड गोल गोल फिरायला लागतं. अशा ब्रम्हांडातच जी चेतनाशक्ती असते ती जर तुम्हाला दिसली, तर खऱ्या अर्थाने देवाचे दर्शन झालं असं मानतात. आम्ही देवाचे दर्शन घेताना मनामध्ये अनेक भौतिक सुखाच्या राशी मांडत असतो आणि मग देवाचं नेमकं रूप आम्हाला दिसतच नाही. खरंतर कोणीतरी येऊन देवाच्या रूपात आमचं काम करून गेलेला असतो, आम्हाला आधार देऊन गेलेला असतो पण अशी देवमाणसं आमच्या डोळ्यासमोर मुळीच येत नाहीत. अशा लोकांचे दर्शन होणं खूप गरजेचं असतं परंतु आम्ही कशाचे दर्शन घ्यायचं हे मनानेच ठरवलं असल्यामुळे आम्ही नेमक्या त्या त्या ठिकाणी जाऊन उभे राहतो. समर्थ अशा प्रकारच्या दर्शनांना फार सुंदर शब्दात वर्णन करतात ‘वस्त्रs शृंगारे शरीर..चातुर्य शृंगारे अंतर, दोघांमध्ये कोण थोर सांगा बरे? म्हणजेच आम्ही देवाची मूर्तीसुद्धा आमच्या मनाला पटेल, रुचेल, आवडेल अशी सुंदर तयार केलेली असते. आम्ही कधी कुणी राक्षसाच्या दर्शनाला जात नाही. आम्ही मंदिरात गेल्यानंतर डोळे मिटून देवाचे दर्शन घेतो. देवाचे डोळे मात्र सताड उघडे असतात. म्हणजे तो आपल्यासारख्या भक्तांचे दर्शन घेतच नाही का? तर तो सतत या विश्वाचे दर्शन घेत असतो. त्याच्यासमोर हे ब्रम्हांड सतत फिरतच असतं. डोळे उघडे ठेवून आम्ही ज्या ज्या गोष्टींचे दर्शन घेतो ते मात्र प्रदर्शन असतं. त्यालाच संतांनी ‘ब्रह्म सत्यं जगत मिथ्या’ असं म्हटलेय ते काही उगाच नाही.

Advertisement

 

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article