For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पन्हाळा तालुक्यातून धैर्यशील माने यांना 85 टक्के मतदान मिळवून देऊ : डॉ. आमदार विनय कोरे

03:46 PM Apr 23, 2024 IST | Abhijeet Khandekar
पन्हाळा तालुक्यातून धैर्यशील माने यांना 85 टक्के मतदान मिळवून देऊ   डॉ  आमदार विनय कोरे
MLA Dr.Vinay Kore
Advertisement

खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचा भव्य मेळावा

कोतोली प्रतिनीधी :

जोतिबाचा गुलाल ज्याच्या बाजूला आहे त्याच्यावर परमेश्वरच्या कृपेने विजयाचा गुलाल पडणार आहे असं मत जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष डॉ. आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर पन्हाळा तालुक्यातून 85टक्के मतदान धैर्यशील दादा तुम्हाला मिळवून देऊ असं अभिवचन दिले.

Advertisement

‘जनसुराज्य शक्ती ज्याच्या बाजूने जाते, त्या बाजूला गुलाल पडतो‘ या इतिहासाची पूर्णवृत्ती होणार अशी ग्वाही कोरे यांनी दिली. त्याचबरोबर राष्ट्रधर्म व राष्ट्रनिर्मिती जपण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन विनय रावजी कोरे यांनी केले.आज पन्हाळा तालुक्यातील महाडिकवाडी येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार महामेळावा मोठ्या उत्सहात संपन्न झाला. या ठिकाणी कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती दाखवली. सावकरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी महामेळाव्याचं नेटक नियोजन केल्याचं दिसून आलं.

सावकारांनी मनावर घेतलं की दोन्ही उमेदवार विजयी होणार हे खर आहे, कारण मला राज्यसभेवर पाठवायच श्रेय त्यांचच आहे. असं मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलं. ते पुढे म्हणाले, शाहू महाराजांचे वय झालेले असताना त्यांना लोकसभेला उभे केलाय, मग त्यांना राज्यसभेवर का पाठवलं नाही? असा सवाल त्यांनी केला. कोल्हापूर जिह्यातील विकासगंगा अशीच वाहत राहण्यासाठी दोन्ही उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन त्यांनी केले.

Advertisement

यावेळी जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, शेतकरी संघांचे संचालक प्रधान पाटील, संताजीबाबा घोरपडे, शिवाजीराव मोरे, बाजार समितीचे संचालक प्रकाश देसाई, दगडू पाटील, प्रकाश पाटील आण्णा, सरपंच दिपाली पाटील, बाबासाहेब शिंदे ,बी के जाधव, विकास पाटील, जनसुराज्य प्रवत्ते राजेंद्र पाटील, भाजपा जिल्हासचिव संदीप पाटील, लालासो पवार व विविध गावाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थाचे पदाधिकारी, जनसुराज्य पक्षाचे पदाधिकारी, व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.