डेअरडेव्हिल बॉर्न अगेन 4 मार्चला झळकणार
बहुप्रतीक्षित मार्वल टेलिव्हिजन सीरिज ‘डेअरडेव्हिल : बॉर्न अगेन’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. 6 वर्षांनी मार्व्हलच्या चाहत्यांच्या पसंतीची सीरिज ‘डेअरडेव्हिल : बॉर्न अगेन’सोबत परतत आहे. चार्ली कॉक्सची मुख्य भूमिका असलेल्या या नव्या सीजनचा प्रीमियर डिस्ने प्लस हॉटस्टारवर 4 मार्च रोजी होणार आहे. या सीजनमध्ये मूळ सीरिजच्या अनेक लोकप्रिय व्यक्तिरेखांना परत आणले गेले आहे. यात नवे चेहरेही जोडण्यात आले आहेत. कॉक्ससोबत विसेंट डी ओनोफ्रियोने विल्सन फिस्कच्या स्वरुपात स्वत:ची भूमिका पुन्हा साकारली आहे, ज्याला किंगपिन म्हणूनही ओळखले जाते. तर जॉन बर्नथल फ्रँक कॅसल किंवा द पनिशर म्हणून परतणार आहे. डेअरडेव्हिल जुन्या आणि नव्या खलनायकांचा सामना करेल. कलाकारांमध्ये डेबोरा एन वोल केरेन पेजच्या स्वरुपात, एल्डन हेंसन फोगी नेल्सनच्या स्वरुपात आणि विल्सन बेथेल पॉइंडेक्स्टरच्या स्वरुपात सामील आहे. नव्या कलाकारांमध्ये मायकल गंडोल्फिनी, मार्गारिटा लेविएवा, जेरेमी अर्ल आणि ऐलेट ज्यूरर वॅनेस मारियाना-फिस्कच्या स्वरुपात सामील आहे. या भूमिका कहाणीला आणखी रोमांचक करतील.