For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Dapoli Mayor: दापोली नगराध्यक्षपदी 'कृपा घाग' यांची वर्णी, शिवसैनिकांचा जल्लोष

10:37 AM May 29, 2025 IST | Snehal Patil
dapoli mayor  दापोली नगराध्यक्षपदी  कृपा घाग  यांची वर्णी  शिवसैनिकांचा जल्लोष
Advertisement

'तीन वर्षात दापोलीचा मागे पडलेला विकासाचा बॅकलॉग भरुन काढू'

Advertisement

दापोली : दापोलीच्या नगराध्यक्षपदी ज्येष्ठ नगरसेविका कृपा शशांक घाग यांची वर्णी लागली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये केवळ त्यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड अपेक्षित मानली जात होती. अखेर बुधवारी प्रशासनाने घाग यांच्या नगराध्यक्षपदावर शिक्कामोर्तब केले.

यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला. तीन वर्षात दापोलीचा मागे पडलेला विकासाचा बॅकलॉग आपण येत्या दोन वर्षात राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भरुन काढू, असा विश्वास घाग यांनी व्यक्त केला. कृपा घाग नगर पंचायतीमध्ये दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.

Advertisement

पूर्वी त्या कोकंबआळी प्रभागातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. आता त्या झरीआळी प्रभागातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. कट्टर शिवसैनिक व राज्यमंत्री योगेश कदम समर्थक अशी त्यांची ओळख आहे. दापोलीच्या राजकारणात गेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उलथापालथ झाल्यावर देखील त्यांनी शिवसेनेची साथ सोडली नव्हती.

राज्यमंत्री योगेश कदम यांच्या संघर्षाच्या काळात घाग कुटुंबिय कदम कुटुंबियांच्या बरोबर खंबीरपणे उभे राहिले. घाग या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यावर सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यानंतर त्यांची दापोलीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष घाग यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालाही अभिवादन केले.

यानंतर दापोली शिवसेना शाखेमार्गे ही मिरवणूक कोकंबआळी येथील राज्यमंत्री योगेश कदम यांच्या कार्यालयापर्यंत काढण्यात आली. यावेळी घाग यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, आरपीआय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.