कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत दाणोली हायस्कूलला दोन पदके

02:46 PM Dec 07, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

लक्ष्मण जंगले आणि सुरेखा बिरू काळे यांनी पटकाविले ब्राँझ पदक

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी
गोंदिया येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत दाणोली येथील कै बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालयाच्या लक्ष्मण सुरेश जंगले आणि सुरेखा बिरू काळे या विद्यार्थ्यांनी ब्राँझ पदक पटकाविले. तर या स्पर्धेत याच हायस्कूलच्या विजय सुरेश जगले याने उत्कृष्ट कामगिरी बजावत सर्वांचे लक्ष वेधले.या स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलगे ४० किलो खालील गटात लक्ष्मण सुरेश जंगले याने तृतीय क्रमांक पटकावित ब्राँझ पदक पटकावले. १७ वर्षाखालील मुली ३५ किलो खालील गटात तृतीय क्रमांक पटकावित सुरेखा बिरू काळे या विद्यार्थिनीने ब्राँझ पदक पटकावले. तर १७ वर्षाखालील मुलगे ५५ किलो खालील गटात - विजय सुरेश जंगले याने उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले.या विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रिडा शिक्षक आर जी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शरद नाईक व सदस्य विद्यालयाचे मुख्याध्यापक जयवंत पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ पालक यांनी अभिनंदन केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#Danoli High School wins two medals in the state-level school kickboxing competition# tarun bharat sindhudurg #konkan update#
Next Article