सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत दाणोली हायस्कूलची पदकांची लयलूट; 20 पदकांची कमाई
या स्पर्धेत 14 वर्षांखालील मुलांच्या गटात शाम प्रकाश पाटील (37 किलो), प्रणित चंदू पाटील (42 किलो) आणि साहिल लक्ष्मण जंगले (47 किलो) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. युवराज संतोष पाटील (37 किलो) याने द्वितीय, तर विराज बाबुराव सावंत (24 किलो) याने तृतीय क्रमांक मिळवला.
14 वर्षांखालील मुलींच्या गटात मिताली अजित चांदेरकर (32 किलो) आणि योगिता रमेश वरख (42 किलो) यांनी प्रथम क्रमांक, तर संगीता रवळू जंगले (32 किलो) हिने द्वितीय क्रमांक मिळवला.
17 वर्षांखालील मुलांच्या गटात मयुरेश जानू वरक (35 किलो), प्रदीप गंगाराम जंगले (40 किलो), राज काशीराम जंगले (45 किलो) आणि भागू बाजू जंगले (50 किलो) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विनेश कृष्णाजी आईर (35 किलो), ओमकार रोड जंगले (40 किलो), दत्ताराम प्रकाश दळवी (45 किलो), लक्ष्मण सुरेश जंगले (50 किलो) आणि सागर सिदू वरक (65 किलो) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. तर नवनाथ विठ्ठल लांबर (65 किलो) याने तृतीय क्रमांक पटकावला.
17 वर्षांखालील मुलींच्या गटात वैष्णवी धोंडी पाटील (35 किलो), रुपाली वेदू लांबर (50 किलो) आणि धनश्री धोंडीबा येडगे (55 किलो) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.
या यशस्वी खेळाडूंना प्रशालेचे क्रीडा मार्गदर्शक शिक्षक आर. जी. पाटील यांचे मार्गदर्शन, तर मुख्याध्यापक जयवंत पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या 9 विद्यार्थ्यांच्या प्रवास व इतर खर्चासाठी संस्थेचे खजिनदार शशिकांत नाईक यांनी 10 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल बाबुराव पाटयेकर शिक्षण प्रसारक मंडळ, झरेबांबरचे अध्यक्ष शरद नाईक, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर मिळवलेले हे यश परिसरात कौतुकाचा विषय ठरले आहे.
