महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मजगाव क्रॉसनजीकचे धोकादायक वृक्ष हटविले

11:23 AM Jul 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मजगाव : उद्यमबाग, मजगाव क्रॉसनजीकच्या मजगाव मुख्य रस्त्यावरील वादळी वाऱ्यामुळे दि. 20 रोजी सायंकाळी अचानक उन्मळून रस्त्यावर कोसळले होते. त्यावेळी दोन दुचाकी व एका कारचे नुकसान झाले होते. सुदैवाने प्राणहानी झाली नाही. यासाठी ‘तरुण भारत’मधून जुनाट वृक्ष हटविण्याचे आवाहन केले होते. याची दखल घेऊन वनखात्याने शनिवारी सकाळी मजगाव क्रॉसनजीकचे धोकादायक वृक्ष हटविल्याने वाहतुकदारांनी नि:श्वास सोडला. सदर रस्त्यावरुन शेकडो वाहने व हजारो नागरिक, विद्यार्थी ये-जा करत असतात. त्यामुळे पालकवर्गानेही धोकादायक वृक्ष हटविल्याने प्रशासनाचे आभार मानले आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article