स्टेशन रोडवरील धोकादायक वृक्षाच्या फांद्या हटविल्या
10:54 AM Jan 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : पोस्टमन सर्कल (अंबा भुवन) ते रेल्वे स्टेशनपर्यंतच्या रस्त्यावर अनेक जुनाट वृक्ष आहेत. या वृक्षांच्या फांद्या कोसळत असल्याने मंगळवारी धोकादायक वृक्षांच्या फांद्या हटविण्यात आल्या. परंतु या कामासाठी रस्ता बंद करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय झाली. शाळा तसेच बाजारात येणाऱ्या नागरिकांना रस्ता बंद असल्याने पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागला. स्टेशन रोडवर रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठी झाडे आहेत. रेल्वेच्या अंतर्गत भागात हे वृक्ष असल्यामुळे ते वर्षानुवर्षे तसेच आहेत. बऱ्याचवेळा पाऊस व वाऱ्यामुळे या वृक्षाच्या फांद्या रस्त्यावर कोसळत असतात. कोणताही अपघात होऊ नये यासाठी मंगळवारी क्रेनच्या साहाय्याने धोकादायक फांद्या हटविण्यात आल्या. काम सुरळीतपणे करता यावे यासाठी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
Advertisement
Advertisement