घातक विषारी वायू
जगभरात अनेक प्रकारचे वायू आढळून येतात, यातील काही वायू माणसांसाठी उपयुक्त असतात. तर काही वायू माणसांसाठी धोकादायक असतात. ऑक्सिजनशिवाय माणसाच्या अस्तित्वाची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. परंतु एका वायूचा गंध घेताच माणसाचा मृत्यू होण्याची शक्यता असते.
पृथ्वीवर अनेक वायू आढळून येतात, यातील काही वायूंमुळे मानवी जीवन धोक्यात येते. तर काही वायूंमुळे माणसांचा क्षणार्धात मृत्यू होऊ शकतो. पृथ्वीच्या वायुमंडळात सर्वाधिक प्रमाणात नायट्रोजन वायू आहे. वायुमंडळात नायट्रोजनचे प्रमाण 78.08 टक्के, ऑक्सिजन 20.95 टक्के, आर्गन 0.93 टक्के, कार्बन डायऑक्साइ 0.04 टक्के आहे.
पृथ्वीवर माणसांसाठी धोकादायक वायू नायट्रोजन आहे. नायट्रोजन वायू अधिक प्रमाणात शरीरात गेल्यास मानवी शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि यामुळे माणसाचा श्वास कोंडू लागतो. याचबरोबर या वायूच्या प्रभावामुळे डोळ्यांमध्ये जळजळ सुरू होते, श्वसनावेळी त्रास होतो आणि तर यामुळे मृत्यूही ओढवू शकतो.
माणूस जेव्हा श्वास घेतो, तेव्हा काही प्रमाणात नायट्रोजन वायू शरीरात जातो, परंतु याचे प्रमाण अत्यंत कमी असते. परंतु पृथ्वीवर असलेले वृक्ष आणि प्राणी नायट्रोजन वायूचा वापर करू शकतात. 100 टक्के नायट्रोजन वायूच्या संपर्कात आल्यास माणसाचा मृत्यू होतो.