या गवतात आढळते धोकादायक विषय
स्पर्श झाल्यास होते अॅलर्जी
पृथ्वीवर लाखो प्रजातीचे वृक्ष-रोपं आहेत. याचबरोबर गवताच्याही अनेक प्रजाती आढळून येतात. यातील काही गवत माणसांसाठी उपयुक्त असतात तर काही प्रजाती अत्यंत धोकादायक असतात. या गवतांना स्पर्श केल्यास माणसांना अॅलर्जी होऊ लागते. हे खास गवत माणसांसोबत प्राण्यांसाठीही धोकादायक असते.
घरांच्या आसपास गवत उगवणे सामान्य बाब असते. जंगली गवत कुठल्याही ठिकाणी उगवते. परंतु एका प्रकारचे गवत दिसून आले तर सावध राहण्याची गरज आहे. या गवताचे नाव गाजर गवत असून ते शेतकऱ्यांच्या पिकाची हानी करते. तसेच माणसांसाठी देखील ते धोकादायक आहे. पार्टेनियम हिस्टेरोफोरस असे याचे शास्त्राrय नाव असून ते रिकामी जमीन, रेल्वेमार्ग किंवा रस्त्याच्या कडेला उगवलेले दिसून येते. हे अत्यंत वेगाने फैलावणारे गवत आहे.
या गवताच्या कुणी संपर्कात आला तर त्याला अॅलर्जी आणि एक्जिमासोबत त्वचा संबंधी रोगही होऊ शकतात. तर अधिक काळ संपर्कात राहिल्यास अस्थमासारखा गंभीर आजार होऊ शकतो.पार्टेनियम हिस्टिरोफोरस या गवतात पारथेनिन नावाची विषारी रसायन अते. याचमुळे याचा स्पर्श झाल्यावर माणूस आणि प्राण्यांवर प्रतिकूल प्रभाव पडतो. यामुळे अॅलर्जी किंवा खाज येणे, डोळ्यात जळजळ, डोळ्यांनजीक काळे डाग, फोड, ताप, अस्थमा, सर्दी, दमा, त्वचा अन् श्वाससंबंधी अॅलर्जी इत्यादी परिणामांसह अनेक आजार होण्याची शक्यता वाढते.