कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विवाहावेळी धोकादायक प्रथा

06:01 AM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वधूच्या दिशेने 3 बाण मारण्याची प्रथा

Advertisement

विवाह हा लोकांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा असतो, अनेक लोक स्वत:च्या विवाहासाठी मोठे नियोजन करत असतात. भारतात वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या प्रथांनुसार विवाह होतात. परंतु विवाहात सर्वात आवश्यक गोष्ट ही विधी असते. जगभरातील विविध देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विधींचे पालन केले जाते. वर आणि वधूला या विधी पूर्ण कराव्या लागतात. परंतु जगातील एका ठिकाणी विवाहाच्या दिवशी वर वधूला खास गोष्टीने मारत असतो.

Advertisement

भारताचा शेजारी देश चीनमध्ये अशाप्रकारच्या अजब परंपरा प्रचलित आहेत. चीनमध्ये अल्पसंख्याक उइगूर समुदायात वराकडून वधूला बाणाने मारले जाते.  विवाहापूर्वी या धोकादायक प्रथेचे पालन करावे लागते आणि ती देखील अनेकवेळा पार पाडावी लागते. या चिनी समुदायात मागील अनेक वर्षांपासून या परंपरेचे पालन केले जात आहे. एकदा वराने वधूला तीनवेळा बाण मारल्यावर हा विधी पूर्ण होतो. मग वधूला स्वत:कडे पडलेल्या या बाणांना जमा करावे लागते आणि त्यांना तोडावे लागते. बाण मारण्यावरून या समुदायाच्या लोकांचे विशिष्ट असे मानणे आहे.  वर अणि वधू परस्परांना आयुष्यात कधीच त्रास देणार नाही, नुकसान देणार नाही असे या प्रथेद्वारे सुनिश्चित केले जाते. परंतु बाणाने वधूला ईजा होण्याची भीती असते, तरीही चीनमधील या भागात या परंपरेचे पालन केले जाते. चीनमध्ये उइगूर समुदायाचे प्रमाण सुमारे 1 कोटी असून तो मूळचा तुर्क वंशाचा असल्याचे मानले जाते. या उइगूर समुदायात अनेक विचित्र प्रथांचे पालन केले जात असल्याने तो अत्यंत अनोखा मानला जातो.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article