For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पिरनवाडी मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये टाकलेल्या खडीचा वाहनधारकांना धोका

10:30 AM Nov 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
पिरनवाडी मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये टाकलेल्या खडीचा वाहनधारकांना धोका
Advertisement

खड्डे बुजविण्यापेक्षा डांबरीकरण करण्याची मागणी

Advertisement

मजगाव : पिरनवाडी गावच्या मुख्य रस्त्यावर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडलेले होते. त्यासाठी वारंवार तक्रार केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने गेल्या दोन दिवसांपूर्वी किणये ते पिरनवाडीपर्यंत व उद्यमबाग-मजगाव क्रॉसपर्यंत सदर खड्ड्यांमध्ये मोठी खडी घातल्याने ती खडी इतरत्र पसरलेली आहे. या पसरलेल्या खडीमुळे चारचाकी आणि दुचाकीधारकांना त्रास होत आहे. शिवाय ती खडी चारचाकी व दुचाकीच्या चाकाला लागून इतरत्र फेकली जात असल्याने नजीकच्या नागरिकांना व वाहतुकदारांना ती खडी उडून दुखापत होण्याची भीती निर्माण झाली आहे. संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरित पाहणी करून सर्व खड्डे बुजवून डांबरीकरण करून द्यावे, अशी मागणी जागरुक नागरिकांतून केली जात आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.