For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजवाळनजीक कार अपघातात दांडेलीतील महिला गंभीर

12:21 PM Oct 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
राजवाळनजीक कार अपघातात दांडेलीतील महिला गंभीर
Advertisement

वार्ताहार/रामनगर

Advertisement

बेळगाव-गोवा महामार्गावरील रामनगरपासून काही अंतरावर असणाया राजवाळ नजीकच्या पेट्रोल पंपासमोर रस्त्यावरून चालत जाणाऱ्या तीन इसमांना वाचवण्याच्या नादात गोवा येथून दांडेलीच्या दिशेने जाणाऱ्या कारला अपघात झाला. KA 02 MK 0294 या क्रमांकांच्या कारने रस्त्याशेजारी असणाऱ्या मातीच्या ढिगाऱ्याला जोराची धडक दिली. यावेळी कारमधील (दांडेली येथील सिटी बस कंडक्टर) मंजुळा फेरो (वय 50) या गंभीर जखमी झाल्या. त्यामुळे त्यांना प्रथम 108 रुग्णवाहिकेतून रामनगर येथील सरकारी हॉस्पिटलला  आणून प्राथमिक उपचार केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी बेळगाव येथे हलविले आहे. मंजुळा या गोवा येथून परत येत असताना सदर अपघात झाला. अपघाताचे ठिकाण खानापूर तालुक्यात येत असल्याने घटनेची नोंद लोंढा पोलिसांत झाली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.