कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नगरपंचायत विरोधात 'दांडके मोर्चा' काढणार

05:56 PM Jul 11, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

आटपाडी :

Advertisement

आटपाडी नगरपंचायत प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणात भ्रष्ट कारभार सुरू आहे. विकासकामे, स्वच्छतेचा ठेका, आठवडा बाजारातील वसुली यासह सर्वच कामातुन कोट्यावधींचा घोटाळा झाला आहे. तसेच नगरपंचायत क्षेत्रात अन्यायकारक आरक्षणे टाकून अनेकांना अडचणीत आणण्यात आले आहे. नगरपंचायत प्रशासनाच्या या कारभाराच्याविरोधात 'दांडके मोर्चा' काढणार असल्याची माहिती भारत पाटील यांनी दिली.

Advertisement

आटपाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते आनंदराव पाटील, भारत पाटील, जितेंद्र जाधव, अशोक लवटे, प्रशांत पाटील, अतुल यादव, रविंद्र लांडगे, तानाजी पाटील, अक्षय लवटे, जालिंदर खंडागळे यांच्या उपस्थितीत नगरपंचायत विरोधात लढ्याची भुमिका जाहीर करण्यात आली. भारत पाटील म्हणाले, सध्या आटपाडी नगरपंचायत क्षेत्रात विकासाच्या नावाखाली आरक्षणे टाकण्यात आली आहेत. ही आरक्षणे लोकांना विश्वासात घेवून नगरपंचायतमध्ये लोकनियुक्त बॉडी अस्तित्वात आल्यानंतरच टाकली पाहिजेत. ठराविकांच्या हितासाठी रिंगरोडसह अन्य कामांसाठी आरक्षणे टाकण्यात आली आहेत.

ही आरक्षणे उठविण्याचा शब्द देवून काही मंडळी राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भारत पाटील यांनी केला.

आटपाडी नगरपंचायतमध्ये प्रशासनाचे राज्य असून त्यांनी भ्रष्टाचाराचे जागतिक रेकॉर्ड मोडले आहेत. मनमानी पध्दतीने टेंडर करणे, कामे न करता पैसे काढणे, मुख्य पेठेतील पाईपलाईन, आंबेबनमळा येथील दोन पूल अशी शेकडो कामे बोगस झालेली आहेत.

आटपाडी नगरपंचायत अस्तित्त्वात आणण्यासाठी आम्ही सातत्याने संघर्ष केला. लढा उभारला. आंदोलने केली. आपल्याच लोकांनी व तत्कालीन लोकप्रतिनिधींनी नगरपंचायत होण्यास खोडा घातला. आम्ही न्यायालयात धाव घेवून नगरपंचायत अस्तित्वात आणली. पण, मुख्याधिकाऱ्यांनी ठराविक कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कमाईचे कुरण बनविले आहे.

ग्रामपंचायत अस्तित्वात असताना शनिवारच्या आठवडा बाजारात १५ ते १६ हजार रूपये कर रूपाने जमा होत होते. आत्ता फक्त २ ते ३ हजारच जमा होत असुन यामध्ये गोलमाल आहे. टक्केवारीचा धंदा नगरपंचायतमध्ये सुरू असुन मुख्याधिकाऱ्यांनी लाखो रूपये खर्चुन तलावालगत पाणी योजनेच्या ठिकाणी कार्यालय थाटले आहे. त्यांनी तेथे कोणाच्या परवानगीने कार्यालय निर्माण केले आहे, याचे उत्तर द्यावे.

आरक्षणाच्या कारणावरून शहरात लोकांमध्ये खळबळ माजली आहे. नगरपंचायतची निवडणुक होवुन नवीन लोकनियुक्त बॉडी सत्तेत आल्यानंतर सर्वांना सोबत घेवून आरक्षण टाकावे. त्यामुळे सदरचे आरक्षण रद्द करावे, अशी मागणी करत याप्रश्नी सर्वांना सोबत घेवुन लोकांच्या हितासाठी आम्ही नगरपंचायत विरोधात दांडके मोर्चा काढणार असल्याचे आनंदराव पाटील, भारत पाटील यांनी सांगितले.

आरक्षणाच्या अन्यायाविरोधात व नगरपंचायतच्या भ्रष्ट कारभाराविरोधात लढा उभारणार आहोत. आरक्षणासह अन्य समस्यांबाबत लोकांनी आमच्याशी संपर्क साधावा. त्यांना न्याय देण्यासाठी लोकशाही संपुष्टात आणणाऱ्यांविरोधात संघर्ष सुरू झाल्याचेही भारततात्या पाटील यांनी स्पष्ट केले

थाटले आहे. त्यांनी तेथे कोणाच्या परवानगीने कार्यालय निर्माण केले आहे, याचे उत्तर द्यावे. आरक्षणाच्या कारणावरून शहरात लोकांमध्ये खळबळ माजली आहे. नगरपंचायतची निवडणुक होवुन नवीन लोकनियुक्त बॉडी सत्तेत आल्यानंतर सर्वांना सोबत घेवून आरक्षण टाकावे. त्यामुळे सदरचे आरक्षण रद्द करावे, अशी मागणी करत याप्रश्नी सर्वांना सोबत घेवुन लोकांच्या हितासाठी आम्ही नगरपंचायत विरोधात दांडके मोर्चा काढणार असल्याचे आनंदराव पाटील, भारत पाटील यांनी सांगितले. आरक्षणाच्या अन्यायाविरोधात व नगरपंचायतच्या भ्रष्ट कारभाराविरोधात लढा उभारणार आहोत. आरक्षणासह अन्य समस्यांबाबत लोकांनी आमच्याशी संपर्क साधावा. त्यांना न्याय देण्यासाठी लोकशाही संपुष्टात आणणाऱ्यांविरोधात संघर्ष सुरू झाल्याचेही भारततात्या पाटील यांनी स्पष्ट केले. नगरपंचायतने स्वच्छतेचा दिलेल्या ठेक्यात गोलमाल असल्याचा गंभीर आरोप भारततात्या पाटील यांनी केला. स्वच्छतेचा ठेका एकाला आणि त्याच्याकडे कामगार मात्र नगरपंचायतचे आहेत. वाहने देखील नगरपंचायतचीच आहेत. नगरपंचायतची यंत्रणा वापरून फक्त ठेकेदाराला स्वच्छतेच्या नावाखाली वर्षाकाठी सव्वाकोटीचे खैरात करून त्यातून पैसे गिळकृत केले जात आहेत. खर्च कोटीच्यावर असलातरी गावातील अस्वच्छता कायम राहिली आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article