देगाव फाटा येथे कोयता नाचवत दहशत माजवली
सातारा :
सातारा शहरात वाढत असलेली गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न सातारा शहर पोलीस आणि शाहुपूरी पोलीस करत आहेत. मात्र, गुन्हेगार हे आपली वृत्ती सोडायला मागत नाहीत. कोयता गँग पुन्हा सक्रीय झाली असून त्यातील चार जणांनी देगाव फाटा येथील भंडारी हाईट्स येथे कोयता नाचवत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एकावर वार केले असून त्या प्रकरणी शहर पोलिसात चार जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 16 डिसेंबर रोजी रात्री 9.30 वाजता अजय राहुल नलवडे (वय 17 रा. इंदिरानगर) यास वेदांत जेरी, अजिंक्य डांगे, युवराज चव्हाण, साहिल रणदिवे (सर्व रा. आकाशवाणी झोपडपट्टी) याने पैसे मागितले. त्यास अजयने नकार दिला. त्या कारणावरुन त्यांनी अजयची कपडे फाडली. त्याच दरम्यान साहिल याने कमरेचा कोयता काढून अजयच्या हातावर मारला. तर अजिंक्यनेही त्याच्याकडील कोयता काढला. त्यानेही अजयच्या हातावर आणि पाठीवर कोयत्याने वार केला. व इतर दोघांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यावरुन चौघांविरुद्ध सातारा शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.