दामू - रवींच्या भेटीमुळे राजकीय तर्कवितर्क
फोंडा : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काल गुऊवारी सकाळी कृषीमंत्री रवी नाईक यांची खडपाबांध-फोंडा येथील कार्यालयात भेट घेऊन तासभर चर्चा केली. सध्या राज्यभरात सुऊ असलेल्या जोरदार राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या दामू-रवी नाईक भेटीमुळे जोरदार तर्कवितर्क सुऊ झाले आहेत. राज्यातील ओबींसींची जातीनिहाय जनगणना करावी या मागणीसाठी भंडारी समाजातील काही नेत्यांनी पुढाकार घेत विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांना साकडे घातल्यानंतर भाजपा सावध झाला आहे. जातीय जनगणनेची मागणी करणाऱ्या या शिष्टमंडळात भंडारी नेते माजीमंत्री दयानंद मांद्रेकर, माजीमंत्री महादेव नाईक, माजी आमदार किरण कांदोळकर व माजी आमदार श्याम सातार्डेकर यांचा सहभाग आहे.
गोवा फॉरवर्डचे प्रमुख व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांना लेखी निवेदन सादर केल्यानंतर विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनाही भंडारी नेत्यांकडून निवेदन सादर करण्यात आले आहे. राज्यात भाजपाचे सरकार असल्याने ओबीसींचा व त्यात प्रामुख्याने टक्केवारीत सर्वाधिक असलेल्या भंडारी समाजाच्या या प्रमुख मागणीसाठी अन्य पक्ष राजकीय लाभ उठविण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध झालेल्या भाजपाने भंडारी समाजाचे बलाढ्या नेते असलेले कृषीमंत्री रवी नाईक यांची भेट घेऊन या मुद्द्यांवर चर्चा केल्याचे वृत्त आहे.
भाजपाने प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्ता मेळावे घेण्यास सुऊवात केली आहे. प्रियोळात नुकत्याच झालेल्या भाजपा कार्यकर्ता मेळाव्यातील काही नेत्यांच्या विधानामुळे मगो-भाजपा युतीवऊन राजकीय वादळ उठले होते. हा विषय दिल्लीपर्यंत पोचला होता. भाजपाला फोंडा मतदारसंघातही कार्यकर्त्यांचा असाच मेळावा घ्यायचा असून त्याच्या आयोजनासंबंधी फोंड्याचे आमदार असलेल्या कृषीमंत्री रवी नाईक यांच्याशी दामू नाईक यांनी चर्चा केल्याचे वृत्त आहे. फोंडा मतदारसंघातही भाजपामध्ये गटबाजी असून या पार्श्वभूमीवर मेळावा आयोजित करताना पक्षांतर्गत असे वाद पुन्हा टाळण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. भंडारी समाज संघटीत कऊन भाजपाचे बळ वाढविण्यासाठी रवी नाईक व दामू नाईक या दोन्ही भंडारी समाजाशी निगडीत नेत्यांचा प्रयत्न असावा, असे तर्क वितर्कही राजकीय गोटातून व्यक्त होत आहेत.